मुंबई

‘मराठी’कडे दुर्लक्ष करू नये!

CD

‘मराठी’कडे दुर्लक्ष करू नये!
मंत्री प्रताप सरनाईक यांचा चालकांना इशारा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : ‘राज्यात रिक्षा, टॅक्सी आणि ॲपआधारित प्रवासी वाहने चालविणाऱ्या अमराठी भाषिक चालकांनी स्थगितीचा आधार घेऊन मराठी शिकण्याकडे दुर्लक्ष करू नये. ‘महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होऊन सर्व अमराठी चालकांनी व्यावहारिक मराठी आत्मसात करावी, असे आवाहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

महाराष्ट्रात राहून, व्यवसाय करून येथील नागरिकांशी दैनंदिन व्यवहार करणाऱ्या प्रत्येक चालकाला प्रवाशांशी आत्मविश्वासाने मराठीत संवाद साधता यावा, यासाठी परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यभरात १८० पेक्षा अधिक ठिकाणी शाखा सुरू करण्यात आल्या. सुमारे १,८०० शिक्षकांच्या माध्यमातून एक लाख ६५ हजार ८०० हून अधिक अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, मात्र राज्यात अद्याप सुमारे आठ ते नऊ लाख अमराठी चालक रिक्षा, टॅक्सी आणि ॲपआधारित वाहने चालवत आहेत. त्यामुळे उर्वरित चालकांपर्यंत पोहोचण्यासाठी अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. मर्यादित वेळेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अमराठी चालकांना व्यावहारिक मराठी भाषा शिकवणे एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे ज्या अमराठी चालकांनी मराठी भाषा शिकलेली नाही, त्यांनी तातडीने प्रशिक्षण वर्गात नाव नोंदवावे अथवा ऑनलाइन पद्धतीने मराठी भाषा शिकावी, असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

दरम्यान, व्यावहारिक मराठीबाबतच्या सुधारित कायद्याच्या अंमलबजावणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही रिक्षा, टॅक्सी संघटनांच्या मागणीनुसार १८ ऑगस्ट २०२७ पर्यंत स्थगिती दिली आहे. ही स्थगिती म्हणजे कायदा रद्द झालेला नाही, हे अमराठी चालकांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे या कालावधीचा उपयोग मराठी भाषा शिकण्यासाठी करावा. १८ ऑगस्ट २०२७ नंतर कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर कोणतीही सबब किंवा मुदतवाढ मिळेलच, असे गृहीत धरू नये, असा स्पष्ट इशारा मंत्री सरनाईक यांनी दिला.

उद्याची कारवाई टाळा!
महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि सामाजिक सलोखा जपण्याबरोबरच प्रवासी आणि चालक यांच्यातील संवाद अधिक सुलभ व्हावा, हा या अभियानाचा उद्देश आहे. त्यामुळे ‘आज मराठी शिका, उद्याची कारवाई टाळा’, असा स्पष्ट संदेश देत अमराठी चालकांनी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले.


...
मराठी शिकण्यासाठी सरकारने प्रशिक्षणाची दारे खुली केली आहेत. स्थगिती ही मराठी शिकण्यापासून पळ काढण्याची संधी नाही, तर स्वतःला तयार करण्यासाठी मिळालेली मुदत आहे. या मुदतीत व्यावहारिक मराठी शिकून घ्या, १८ ऑगस्ट २०२७ नंतर कायद्याची अंमलबजावणी करताना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT