सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबई महानगरातील ओव्हरलोड वाहनांची बेकायदा वाहतूकविरोधात मराठी कामगार सेनेने परिवहन आयुक्त कार्यालयावर सोमवारी जोरदार धरणे आंदोलन केले. त्यावर मुंबई महानगरातील ओव्हरलोड वाहतुकीला कारवाई करण्यासाठी ७ ते २२ ऑक्टोबरदरम्यान आरटीओची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन विभागाने दिली.
मराठी कामगार सेनेने ओव्हरलोडिंगच्या या बेकायदा रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या सर्व संशयित दलाल/हप्तेखोर एजंट आणि संबंधित जबाबदार आरटीओ अधिकाऱ्यांची तत्काळ उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच वारंवार ओव्हरलोडिंग करणाऱ्या वाहनांचे परमिट रद्द करावे.
क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या वाहनांवर केवळ नावापुरती दंडात्मक कारवाई करून सोडून दिले जाते. त्यामुळे ज्या वाहनांवर दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा ओव्हरलोडिंगचा दंड ठोठावण्यात आला आहे, अशा वाहनांचे वाहन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात यावेत आदी मागण्या केल्या होत्या.
आश्वासनानंतर आंदोलन मागे
सुमारे दोन तास चाललेल्या आंदोलनानंतर अपर परिवहन आयुक्त रवी गायकवाड यांनी मध्यस्थी करत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. ७ ऑक्टोबरपासून मुंबई व आसपासच्या महानगर प्रदेशात ‘फिरते भरारी पथक’ तैनात केले जाईल आणि संपूर्ण शहरात कुठेही ओव्हरलोडिंग दिसता कामा नये, असे सक्त आदेश त्यांनी प्रादेशिक अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भातील जाहीर पत्र आणि आदेशही प्रशासनाकडून तातडीने काढण्यात आले. प्रशासनाकडून मिळालेल्या या लेखी आश्वासनानंतर मराठी कामगार सेनेने आपले आंदोलन मागे घेतले.
ओव्हरलोडिंग तत्काळ बंद झालीच पाहिजे. जर प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची योग्य अंमलबजावणी केली नाही आणि ओव्हरलोडिंग थांबली नाही, तर यापुढे थेट रस्त्यावर उतरून तीव्र ‘चक्का जाम’ आंदोलन करू.
- सुधीर नवले, कार्याध्यक्ष, मराठी कामगार सेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.