मुंबईतील आठ आस्थापनांवर ‘एफडीए’चा बडगा
पाच परवाने निलंबित; अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक मोहीम राबवत आठ अन्न आस्थापनांवर कारवाई केली. तपासणीदरम्यान अन्नपदार्थांची हाताळणी, साठवणूक, परिसराची स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या आवश्यक नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने पाच आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित, तर तीन आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
एफडीएकडून १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान विविध अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. कॅफे सुलतान कलिना, लो फ्रेश फूड प्रा. लि. मरोळ, कंट्री क्लब, अंधेरी पश्चिम, सुरज लामा मोमोज, अंधेरी पश्चि, कॅफे पकीझा, सांताक्रूझ पश्चिम येथे अन्नपदार्थांची हाताळणी, साठवणूक आणि परिसराच्या स्वच्छतेबाबत आवश्यक मानकांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या आस्थापनांचे परवाना निलंबित करण्यात आला. दुसरीकडे ब्लिंकिट, एस. व्ही. रोड, विलेपार्ले, कोपनहेगन हॉस्पिटॅलिटी, विलेपार्ले ईटक्लब्स, वांद्रे पश्चिम याठिकाणी येथे अन्न व्यवसायाशी संबंधित परवाना अटी तसेच अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या आवश्यक तरतुदींचे पालन होत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात आली.
नियम पाळा अन्यथा परवाना गमवाल!
मुंबईतील आठ आस्थापनांवरील कारवाईमुळे अन्न व्यावसायिकांनी स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. सणासुदीच्या काळात कारवाईची मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाईचा इशारा एफडीएकडून देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.