आणिक डेपोत अग्नितांडव
‘बेस्ट’च्या १० सीएनजी मिडी बस खाक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : सायन येथील प्रतीक्षानगरमधील आणिक बस आगारात उभ्या असलेल्या ‘बेस्ट’च्या बसना भीषण आग लागल्याची घटना सोमवारी संध्याकाळी ५:४४ वाजताच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत १० मिडी बस जळून खाक झाल्या. जळालेल्या सर्व बस ‘सीएनजी’वर चालणाऱ्या आणि ‘वेट लीज’ तत्त्वावरील होत्या, अशी माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी अथवा कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती प्रशासन नाही.
बेस्ट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आगारात उभ्या असलेल्या एका बसला अचानक आग लागली आणि ती वेगाने शेजारील बसमध्ये पसरली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने १० बसमध्ये ही आग पसरली. या घटनेची माहिती मिळताच बेस्ट प्रशासन आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने या आगीला ‘लेव्हल-१’ची आग म्हणून घोषित केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी चार अग्निशमन बंब, पाच जंबो टँकर्स, एक एअर वॉटर टेंडर, एक क्विक रिस्पॉन्स व्हेईकल आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.
कारण अद्याप अस्पष्ट; चौकशी सुरू
आगीमुळे प्रतीक्षानगर आणि आणिक आगाराच्या परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी बेस्ट प्रशासन, अग्निशमन दल आणि पोलिस अधिक तपास करत आहेत.
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.