राज्यात उभारणार एकात्मिक डायग्नोस्टिक नेटवर्क
न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स आणि ‘एनएम’ मेडिकलमध्ये करार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : देशातील आघाडीच्या डायग्नोस्टिक समूहांपैकी एक असलेल्या न्यूबर्ग डायग्नोस्टिक्सने राज्यातील एनएम मेडिकलसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या सहकार्यामुळे राज्यात पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी आणि प्रिव्हेंटिव्ह वेलनेस सेवा एकत्र आणून अत्याधुनिक एकात्मिक डायग्नोस्टिक नेटवर्क उभारले जाणार आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईसह राज्यातील विविध भागांत एकात्मिक निदान केंद्रे, अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब्स, वेलनेस सेंटर्स आणि सॅम्पल कलेक्शन सेंटर्स सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे रुग्णांना त्यांच्या जवळच उच्च दर्जाच्या तपासण्या, इमेजिंग, जीनोमिक्स आणि इतर वैद्यकीय निदान सुविधा उपलब्ध होणार आहेत.
मुंबईत ‘ॲटलास’ वेलनेस उपक्रमाचा शनिवारी (ता. ३) क्रिकेटपटू एम.एस. धोनी यांच्या हस्ते करण्यात आला. या माध्यमाद्वारे डायग्नोस्टिक्स, इमेजिंग, जीनोमिक्स आणि वैयक्तिक आरोग्यविषयक माहिती एकाचव्यासपीठावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. रुग्णांना आजारांचा धोका लवकर ओळखणे आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे नियोजन करणे यामुळे सुलभ होणार आहे. एनएम मेडिकलचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील संयुक्त संस्थेचे अध्यक्ष डॉ. नीलेश शाह म्हणाले, ‘गेल्या चार दशकांहून अधिक काळ एनएम मेडिकलने क्लिनिकल गुणवत्ता, अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञान आणि रुग्णांच्या विश्वासावर आपली ओळख निर्माण केली आहे. ‘न्यूबर्ग’ सोबतच्या या सहकार्यामुळे आमच्या रेडिओलॉजी आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर क्षमतेला अत्याधुनिक पॅथॉलॉजी, जीनोमिक्स आणि आण्विक डायग्नोस्टिक्सची जोड मिळाली आहे. या एकत्रीकरणामुळे डॉक्टरांना निदानासाठी सखोल माहिती आणि रुग्णांना एकाच ठिकाणी विविध निदान व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांचा लाभ मिळेल.’ या भागीदारीमुळे आजाराचे अचूक निदान, वेळेवर उपचार आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा यांना चालना मिळून राज्यातील रुग्णांना अधिक सुलभ आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
उच्च दर्जाची सेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट
न्यूबर्ग डायग्नोस्टिक्सचे संस्थापक, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. जी. एस. के . वेलू यांनी सांगितले की, ‘आधुनिक रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, जीनोमिक्स आणि प्रिव्हेंटिव्ह वेलनेस या क्षेत्रांना एकत्र आणून राज्यात मजबूत डायग्नोस्टिक नेटवर्क उभारण्याचे उद्दिष्ट आहे. डॉक्टरांना अचूक माहिती आणि रुग्णांना उच्च दर्जाची सेवा उपलब्ध करून देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.