मुंबई

एसआरए इमारतींमधील ४५६ घुसखोरांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा दणका

CD

एसआरए इमारतींमधील ४५६ घुसखोरांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा दणका
उपजिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करत सदनिकांना ठोकले टाळे; एसआरए योजनांना असहकार्य करणाऱ्यावरही कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पुनर्वसन इमारतींमध्ये अनधिकृतपणे घुसखोरी करून राहणाऱ्या घुसखोरांवर एसआरएने मोठा दणका दिला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुंबई शहरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित घुसखोरांवर कारवाई करत त्यांना बाहेर काढून ४५६ सदनिकांना टाळे ठोकले आहेत. तसेच एसआरए योजनेला असहकार्य करणाऱ्या झोपडीधारकांवरही निष्कासन कारवाई केली आहे.
महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ च्या कलम ३३, ३३ व ३८ नुसार उपजिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. त्यानुसार २०२४ पासून ते आतापर्यंत एसआरएने स्वतःच्या अधिकारात ३०२ सदनिकांवर कारवाई केली आहे. या सदनिका पुनर्वसन इमारतींमधील असून, त्यामध्ये मूळ पात्र लाभार्थी न राहता अनधिकृत व्यक्ती वास्तव्य करत असल्याचे आढळले होते. अशा सदनिकाधारकांविरुद्ध निष्कासन कार्यवाही करून त्या सील बंद करण्यात आल्या आहेत. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कलम ३३ अन्वये आणखी १५४ सदनिका सील करण्यात आल्या. अशा एकूण ४५६ घुसखोरांवर कारवाई करत सदनिका सील केल्या आहेत.
अनेक पात्र झोपडीधारकांना घरे मिळूनही ते भाड्याने देऊन किंवा विकून अनधिकृत व्यक्तींना घुसवतात, तर काही झोपडीधारक जाणीवपूर्वक योजनेत अडथळा आणतात. यामुळे गरजू आणि पात्र लाभार्थ्यांचे नुकसान होते. ही साखळी तोडण्यासाठी उपजिल्हाधिकारी स्तरावरून थेट सदनिका सील बंद करण्याची कारवाई केली जाते.

एसआरए योजनेला असहकार्य करणाऱ्यावरही कारवाई
अनेकदा एसआरए योजना मंजूर झाल्यानंतरही झोपडीधारकांकडून असहकार्य केले जाते. सर्वेक्षण, संमती, बायोमेट्रिक आणि कागदपत्र पडताळणीसाठी सहकार्य न केल्याने प्रकल्पाला विलंब होतो. त्याची दखल घेत एसआरएच्या मुंबई शहरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी २०२४ पासून आतापर्यंत कलम ३३/३८ अन्वये २८६० झोपड्या निष्कासीत केल्या आहेत, तर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अशाच ४६ झोपड्यांवर अतिरिक्त कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी

Satej Patil Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या बिनविरोधसाठी सतेज पाटलांना ४ जागा?, बंटी पाटलांनी हसत हसत कंडका पाडला

Kalamb Crime : पवनचक्की तार चोरीचा पर्दाफाश; पाच जणांना अटक, ११ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Marathi News Live Updates: बारामतीत राष्ट्रवादीकडून 'सोमेश्वर'चा जाहीरनामा प्रसिध्द

Mumbai: तीन दिवसांपासून दार बंद, घर उघडतात ४० वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला; मालवणीतील संशयास्पद मृत्यूने खळबळ

SCROLL FOR NEXT