मुंबई

नऊ महिन्यांच्या बालिकेला जीवदान

CD

मुंबई, ता. ६ : वारंवार होणारे श्वसनमार्गाचे संसर्ग, हृदय निकामी होण्याची लक्षणे आणि वजन न वाढणे अशा गंभीर समस्यांनी त्रस्त असलेल्या नऊ महिन्यांच्या बालिकेवर ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे. जे. रुग्णालय, मुंबई येथील हृदयरोग विभागात जीवनरक्षक उपचार करण्यात आले.

अवघ्या पाच किलो वजनाच्या या बालिकेतील पाच मिलिमीटर आकाराचा ‘पेटंट डक्टस आर्टेरिओसस’ (पीडीए) विशेष उपकरणाच्या साहाय्याने यशस्वीपणे बंद करण्यात आला. ही प्रक्रिया प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत (पीएम-जेवाय) पूर्णपणे मोफत करण्यात आली.

पीडीए म्हणजे महाधमनी आणि फुप्फुसाची धमनी यांना जोडणारी, जन्मानंतर बंद होणे अपेक्षित असलेली रक्तवाहिनी उघडी राहणे. या बालिकेत मोठ्या पीडीएमुळे फुप्फुसांकडे अतिरिक्त रक्तप्रवाह होऊन हृदयावर ताण येत होता आणि तिच्या वाढीवर परिणाम होत होता. कॅथेटरद्वारे विशेष उपकरण बसवून ही रक्तवाहिनी बंद करण्यात आली.

हृदयरोग विभागाचे युनिटप्रमुख व सहयोगी प्राध्यापक डॉ. अनंत मुंडे यांनी डॉ. हरिओम कोलपकर आणि त्यांच्या टीमच्या सहकार्याने ही प्रक्रिया केली. हृदय व वक्ष शल्यचिकित्सा विभाग (सीव्हीटीएस), भूलशास्त्र विभाग आणि बालरोग विभागाने महत्त्वपूर्ण योगदान दिले. अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांच्या नेतृत्वाखाली विविध विभागांच्या समन्वयातून हे उपचार करण्यात आले.

गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा
या सुविधांचा जास्तीत जास्त पात्र व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हृदयरोग विभागातर्फे करण्यात आले आहे. उपचारांची आवश्यकता, योजनेची पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शनासाठी सर जे. जे. रुग्णालयाच्या हृदयरोग बाह्यरुग्ण विभागाशी किंवा पीएम-जय मदत कक्षाशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

SCROLL FOR NEXT