मुंबई

ऑक्टोबर हिटचा रेल्वे रुळांनाही तडाखा; आपत्कालीन ब्लॉकमुळे लोकल रखडली

CD

ऑक्टोबर हीटचा रेल्वे रुळांना तडाखा
आपत्कालीन ब्लॉकमुळे लोकल २० ते २५ मिनिटे विलंबाने
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : ऑक्टोबर हीटमुळे रेल्वे रूळ तापून त्यांच्या प्रसरणाचा धोका वाढतो. यामुळे मध्य रेल्वेला मंगळवारी परळ, दिवा आणि दिघा येथे आपत्कालीन ब्लॉक घ्यावे लागले. रुळांची तपासणी आणि देखभालीसाठी वाहतूक थांबविल्याने लोकल सेवेला याचा फटका बसला. काही लोकल २० ते २५ मिनिटे विलंबाने धावल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.
परळ येथील डाऊन धीम्या मार्गावर दोन वेळा, तर त्यानंतर दिवा आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा स्थानकाजवळ ब्लॉक घेण्यात आला. परिणामी संबंधित मार्गांवरील लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.

रुळांच्या प्रसरणाचा धोका
ऑक्टोबरमधील तापमानवाढीने रेल्वे रुळांच्या प्रसरणाची शक्यता असते. प्रसरणाचे प्रमाण वाढल्यास रुळांच्या स्थितीवर परिणाम होऊन रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक थांबवून रुळांची तपासणी आणि आवश्यक दुरुस्ती केली जाते.

तीन ठिकाणी तातडीने ब्लॉक
परळ येथे दुपारी १२.३० ते १२.४५ आणि पुन्हा १.०५ ते १.२५ या वेळेत डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला. दिवा येथे १.३८ ते १.५३ या वेळेत डाऊन धीम्या मार्गावर वाहतूक थांबविण्यात आली. त्यानंतर ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा स्थानकाजवळ २.०९ ते २.२५ या वेळेत ब्लॉक घेण्यात आला.

लोकल विलंबाने स्थानकांवर गर्दी
वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेल्या आपत्कालीन ब्लॉकमुळे लोकलच्या फेऱ्यांचे वेळापत्रक विस्कळित झाले. काही लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावल्याने स्थानकांवर गर्दी वाढली. लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची चांगलीच धावपळ झाली.
-़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
आपत्कालीन ब्लॉक
परळ : १२.३० ते १२.४५ आणि १.०५ ते १.२५ - डाऊन धीमा मार्ग
दिवा : १.३८ ते १.५३ - डाऊन धीमा मार्ग
दिघा : २.०९ ते २.२५ - ट्रान्स हार्बर मार्ग
परिणाम : काही लोकल २० ते २५ मिनिटे विलंबाने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

SCROLL FOR NEXT