मुंबई

बाईक टॅक्सीला परवानगी देऊ नये

CD

बाइक टॅक्सीला परवानगी देऊ नये
मुदतवाढीला इंडियन गिग वर्कर्स फ्रंटचा विरोध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : पेट्रोलवर चालणाऱ्या बाइक टॅक्सीचे इलेक्ट्रिक बाइक टॅक्सीत रूपांतर करण्यासाठी परिवहन विभागाने सहा महिन्यांची मुदत दिल्याच्या निर्णयाला इंडियन गिग वर्कर्स फ्रंटने तीव्र विरोध केला आहे. पेट्रोल असो किंवा इलेक्ट्रिक, महाराष्ट्रात बाइक टॅक्सीला कोणत्याही स्वरूपात परवानगी देऊ नये, अशी मागणी संघटनेने केली आहे.
नियमांचे आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता बाइक टॅक्सी सेवा चालवल्याचा आरोप असलेल्या कंपन्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना सहा महिन्यांची मुदत देणे म्हणजे नियमभंगाला प्रोत्साहन देण्यासारखे असल्याचे संघटनेने म्हटले आहे. अशा कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांना सवलत का दिली जात आहे, असा सवालही करण्यात आला आहे. केवळ पेट्रोल बाइकचे इलेक्ट्रिक वाहनात रूपांतर केल्याने प्रवासी वाहतुकीचा कायदेशीर अधिकार मिळत नाही. प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक परवाना, विमा, चालकांची पात्रता, प्रवाशांची सुरक्षितता आणि अन्य वैधानिक बाबींची पूर्तता आवश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. बाइक टॅक्सीला प्रोत्साहन मिळाल्यास आधीच ॲपआधारित वाहतूक सेवांमुळे अडचणीत असलेल्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने रिक्षा-टॅक्सीचालकांच्या रोजगाराचा विचार करून स्पष्ट धोरण जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
===
आंदोलनाचा इशारा
बाइक टॅक्सी चालवणाऱ्या कंपन्यांच्या कामकाजाची चौकशी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई करावी. तसेच सहा महिन्यांची मुदत रद्द करून बाइक टॅक्सीला कोणत्याही स्वरूपात परवानगी देऊ नये, अशी मागणी इंडियन गिग वर्कर्स फ्रंटचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''सगळं लक्षात ठेवणार!'', राहुल-प्रियंका यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा काँग्रेसचा आरोप; व्हिडीओ केला पोस्ट

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT