मुंबई

आणिक आगार अग्नितांडवात प्रकरण : बेस्टची सुरक्षा ‘नॉट बेस्ट’!

CD

आणिक आगार आग प्रकरण :
़़़़़
बेस्टची सुरक्षा ‘नॉट बेस्ट’!
आगारात अग्निशमन यंत्रणा नसल्याचे उघड; अध्यक्षा विश्वासराव आक्रमक
​मुंबई, ता. ६ : सायन येथील आणिक डेपोमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे बेस्ट प्रशासनाच्या सुरक्षिततेचा बुरखा फाटला आहे. आगारात कोणतीही अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसल्याने आग वेळेत विझवता आली नाही. यात १२ बस खाक झाल्या. या गंभीर प्रकारानंतर बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी आक्रमक भूमिका घेत महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना थेट पत्र लिहिले असून, प्रत्येक आगारात २४ तास अग्निशमन वाहन तैनात करण्याची आग्रही मागणी केली आहे.
​बेस्ट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबरला सायंकाळी वेट-लीजवरील बस क्रमांक ७२४२ मध्ये अचानक आग लागली. वाऱ्याच्या वेगामुळे ही आग क्षणार्धात पसरली आणि बाजूला उभ्या असलेल्या इतर वाहनांनाही तिने कचाट्यात घेतले. यात सात बससह ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या पाच बस पूर्णपणे खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले; मात्र तोपर्यंत बेस्टचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते.
​आणिक आगारात सात जुन्या आणि पाच नव्या बसेस आगीच्या भक्षस्थानी पडल्याने उपक्रमाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ‘‘आगारात प्राथमिक अग्निशमन यंत्रणाच उपलब्ध नसल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात आग विझवणे शक्य झाले नाही,’’ असा थेट ठपका तृष्णा विश्वासराव यांनी पत्राद्वारे ठेवला आहे. त्यामुळे बेस्टच्या सुरक्षा व्यवस्थेचे पितळ उघडे पडले.

अग्निशमन वाहन तैनात करावे
​डेपोमध्ये दररोज शेकडो बस उभ्या असतात. अशा ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक सुविधा तत्काळ उपलब्ध असणे अनिवार्य आहे. आगीच्या घटनेची पुनरावृत्त होऊ नये आणि बेस्टच्या मालमत्तेचे संरक्षण व्हावे, यासाठी प्रशासनाने प्रत्येक आगारात कायमस्वरूपी अग्निशमन वाहन तैनात करावे, अशी मागणी विश्वासराव यांनी पत्रात केली आहे.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT