मुंबई

अमरावतीतील उमेश कोल्हे हत्याप्रकरण

CD

मुख्य आरोपीचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला
उमेश कोल्हे हत्याप्रकरणी विशेष एनआयए न्यायालयाचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : अमरावती येथील औषधविक्रेते उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अतिब रशीदचा दोषमुक्तीचा अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावला. खटला चालविण्यासाठी रशीदविरोधात प्रथमदर्शनी पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याचे विशेष सत्र न्यायाधीश चकोर एस. बाविस्कर यांनी अर्ज फेटाळून लावताना नमूद केले.
कोल्हे यांनी नूपुर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याच्या पार्श्वभूमीवर जून २०२२मध्ये त्यांची हत्या झाली होती. या प्रकरणात ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. सर्व आरोपी एकाच उद्देशाने काम करीत असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. कोल्हे यांची हत्या विशिष्ट समाज घटकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. हत्या करण्याच्या कटाचे आणि त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे पुरावे आरोपपत्रासोबत सादर करण्यात आले आहेत. रशीद आणि प्रत्यक्ष हल्लेखोरांमध्ये हत्येपूर्वी व हत्येनंतर शेकडो फोन कॉल झाल्याचे कॉल डिटेल रेकॉर्डमधून स्पष्ट होते. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये रशीदची उपस्थिती दिसून आली. हत्येनंतर रशीदने सहआरोपीला संदेश पाठविल्याचेही तपासात समोर आले. मोबाईलमधील माहिती हटवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

58 वर्षांनंतर नवरात्रीत बनतोय दुर्मीळ योग! ‘या’ 3 राशींवर होणार विशेष कृपा म्हणे; पैसा, नोकरी अन् व्यवसायात मिळू शकतो मोठा फायदा

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

SCROLL FOR NEXT