मुंबई

काळाचौकी येथील म्हाडाचे वसतिगृह खुले होण्यास डिसेंबर उजाडणार

CD

काळाचौकी येथील म्हाडाचे वसतिगृह खुले होण्यास डिसेंबर उजाडणार
लिफ्ट, पार्किंगचे काम बाकी; नोकरी, शिक्षणासाठी येणाऱ्या मुला-मुलींची सोय होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : शिक्षणाबरोबरच नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत येणाऱ्या मुला-मुलींची गैरसोय टाळण्यासाठी म्हाडाकडून काळाचौकी जिजामाता नगर येथे उभारले जात असलेले वसतिगृह खुले होण्यास डिसेंबर उजाडणार असल्याचे समोर आले आहे. वसतिगृहाच्या १८ मजली गगनचुंबी इमारतीचे काम पूर्ण झाले असून, दिवाळीदरम्यान खुले करण्याचा म्हाडाचा विचार होता. मात्र लिफ्ट आणि पार्किंगची सुविधा उभारण्याचे काम अद्याप बाकी आहे. ते पूर्ण झाल्यानंतर ओसीसाठी अर्ज केला जाणार आहे. त्यामुळे हे वसतिगृह डिसेंबरमध्ये खुले केले जाऊ शकणार आहे.
मुंबईत शिक्षण, नोकरीनिमित्त बाहेरून येणाऱ्या मुला-मुलींना भाड्याने घरे शोधण्यासाठी वणवण करावी लागते. अनेकदा सिंगल असल्याने घर भाड्याने घेणे परवडत नाही. त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे काळाचौकीतील जिजामाता नगर येथे तब्बल ३५ कोटी रुपये खर्चून १८ मजली वसतिगृहाचे काम सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आले आहे.
सुरुवातीला या वसतिगृहाचे लोकार्पण दिवाळीत करण्याचे म्हाडाचे नियोजन होते. मात्र लिफ्ट आणि पार्किंगचे काम अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत पूर्ण करून डिसेंबरमध्ये खुले करण्याचे प्रयत्न असल्याचे म्हाडाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई मंडळातर्फे २०२२ साली काळाचौकी येथील जिजामाता नगर येथे वसतिगृह उभारण्याचे काम सुरू झाले होते.

खासगी एजन्सीच्या मदतीने चालवणार
जिजामाता नगर काळाचौकी येथील वसतिगृह चालवण्यासाठी म्हाडा खासगी एजन्सीची नियुक्ती करणार आहे. या इमारतीमध्ये पाहिले पाच मजले व्यावसायिक वापरासाठी दिले जाणार आहेत, तर उर्वरित मजल्यांवर जवळपास १२५ खोल्या असून, त्यामध्ये प्रत्येकी तीन बेडची व्यवस्था असणार आहे. त्यामुळे नोकरी किंवा शिक्षणासाठी मुंबईत येणाऱ्या मुला-मुलींना दिलासा मिळू शकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ ODI Squad: ट्वेंटी-२० संघ जाहीर केला, मग वन डेचा का नाही? निवड समिती पर्यायी संघ निवडण्याच्या तयारीत; पण असं का?

Ladki Bahin Yojana : 'कोणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही'; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही केलं भाष्य

Kannad Drought : दुष्काळाच्या झळा! दुष्काळामुळे शेतीतील रोजगार संपला; ऊसतोडीला जाणा-या मजुरांच्या संख्येत मोठी वाढ

CJP Jantar Mantar Protest: शनिवारी सीजेपीचं पुन्हा 'जंतरमंतर'! मुख्य प्रवक्ते सौरव दास दिल्ली पोलिसांच्या भेटीला, म्हणाले...

Latest Marathi News Live Update : फ्रान्सचे हेन्री बी. कागन आणि जपानचे केन्सो सोई यांना 2026 चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार

SCROLL FOR NEXT