मुंबई

डॉक्टरांच्या बायोमेट्रिक हजेरीवर प्रश्नचिन्ह

CD

डॉक्टरांच्या बायोमेट्रिक हजेरीवर प्रश्नचिन्ह
प्रशासनाचा ‘आरटीआय’अंतर्गत माहिती देण्यास नकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मालाड येथील मनोहर वामन देसाई महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या बायोमेट्रिक हजेरीचा मुद्दा चर्चेत आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी एप्रिल ते जून २०२६ या कालावधीतील विविध श्रेणीतील डॉक्टरांच्या बायोमेट्रिक हजेरीची माहिती मागितली होती, मात्र रुग्णालय प्रशासनाने ही माहिती देण्यास नकार दिला आहे.

कोठारी यांनी वरिष्ठ निवासी डॉक्टर, रजिस्ट्रार, हाऊस ऑफिसर, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांच्यासह विविध पदांवरील डॉक्टरांच्या बायोमेट्रिक हजेरीच्या प्रती मागितल्या होत्या, मात्र माहिती अधिकार कायद्यातील कलम ८(१)(i) अंतर्गत ही माहिती देता येत नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. या निर्णयावर समाधान नसल्यास ३० दिवसांत प्रथम अपील करता येणार आहे. दरम्यान, हजेरीच्या नोंदीवरून प्रश्न उपस्थित होत असतानाच पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ६ ऑक्टोबर रोजी परिघीय आणि विशेष रुग्णालयांसाठी स्वतंत्र परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार सर्व नियमित आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरीची नोंद काटेकोरपणे करावी, तसेच कामाच्या वेळेत नियुक्त ठिकाणी उपस्थित राहून ठरवून दिलेल्या शिफ्टनुसार काम करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

गैरहजेरीवर शिस्तभंगाची कारवाई
बायोमेट्रिक हजेरीमध्ये अनियमितता आढळल्यास किंवा परवानगीशिवाय कर्मचारी गैरहजर राहिल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा पालिकेने दिला आहे. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीवर आता पालिकेचे अधिक काटेकोर लक्ष राहणार आहे. बायोमेट्रिक नोंद आणि कामाच्या वेळेतील प्रत्यक्ष उपस्थिती यामध्ये तफावत राहू नये, यासाठी प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Adulteration : दुध भेसळीचे धागेदोरे मंचरपासून सोलापूर, इंदापूरपर्यंत; ‘एफडीए’ ने काढली भेसळखोरांची कुंडली, 'सोनाई डेअरी'ला भेसळयुक्त दूधाचा पुरवठा

Pune News : आम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न बघायचे नाही का?; महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सवाल, दोन केंद्रावरील परीक्षा रद्द

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Shendurwada News : रक्तरंजित वाळू, जमिनीच्या व्यवहाराची नशा, अन् विकासकामांतील भ्रष्टाचार मार्गाने पैसा कमावण्याचा नाद सुटेना

MPSC Agitation Suspended : एमपीएससी विद्यार्थ्यांचे टिळक चौकातील आंदोलन स्थगित; उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

SCROLL FOR NEXT