मुंबई

तीन एक्स्प्रेसची सीएसएमटीपर्यंची सेवा पूर्ववत

CD

तीन एक्स्प्रेसची सीएसएमटीपर्यंची सेवा पूर्ववत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासासाठी सुरू असलेल्या ७५ दिवसांच्या ब्लॉकदरम्यान दादरपर्यंत मर्यादित करण्यात आलेल्या तीन एक्स्प्रेस गाड्यांची सेवा आता सीएसएमटीपर्यत पूर्ववत करण्यात आली आहे. त्यामुळे अमरावती, लातूर आणि बीदर येथून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
गाडी क्रमांक १२११२ अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस, २२१०८ लातूर-सीएसएमटी एक्स्प्रेस आणि २२१४४ बीदर-सीएसएमटी एक्स्प्रेस या तीन गाड्या ब्लॉकमुळे दादरपर्यंतच चालवण्यात येत होत्या. आता या तिन्ही गाड्यांची सेवा सीएसएमटीपर्यंत पूर्ववत करण्यात आली आहे. सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात रेल्वे विकास प्राधिकरणामार्फत (आरएलडीए) फलाट क्रमांक १४ आणि १५ तसेच स्टेबलिंग लाइन क्रमांक १५ वर पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. या कामांसाठी १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबरदरम्यान ७५ दिवसांचा वाहतूक आणि विद्युत ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉकच्या कालावधीत फलाट क्रमांक १४ आणि १५ उपलब्ध होईपर्यंत सीएसएमटी येथे सेवा समाप्त करणाऱ्या गाड्यांना उपलब्धतेनुसार अन्य योग्य फलाटांवर वळविण्यात येणार आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाडी आणि फलटांसंदर्भातील अद्ययावत माहिती तपासावी, असे मध्य रेल्वेने आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Adulteration : दुध भेसळीचे धागेदोरे मंचरपासून सोलापूर, इंदापूरपर्यंत; ‘एफडीए’ ने काढली भेसळखोरांची कुंडली, 'सोनाई डेअरी'ला भेसळयुक्त दूधाचा पुरवठा

Pune News : आम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न बघायचे नाही का?; महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सवाल, दोन केंद्रावरील परीक्षा रद्द

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Shendurwada News : रक्तरंजित वाळू, जमिनीच्या व्यवहाराची नशा, अन् विकासकामांतील भ्रष्टाचार मार्गाने पैसा कमावण्याचा नाद सुटेना

MPSC Agitation Suspended : एमपीएससी विद्यार्थ्यांचे टिळक चौकातील आंदोलन स्थगित; उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

SCROLL FOR NEXT