मलनिस्सारण केंद्रांत एआयचा वापर वाढवा!
सकाक वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : पालिकेच्या मलनिस्सारण उदंचन केंद्रांचे कार्य अधिक कार्यक्षम आणि प्रभावी पद्धतीने चालविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करावा, असे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिले.
वांद्रे येथील अंतर्गामी उदंचन केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) आधारित माहिती व विश्लेषण केंद्राला डॉ. शर्मा यांनी आज भेट दिली. प्रमुख अभियंता (मलनिस्सारण प्रचालन विभाग) प्रचिती देसाई, संबंधित अधिकारी आदी या वेळी उपस्थित होते. पालिकेच्या मलनिस्सारण प्रचालन विभागाद्वारे मेट्रो वेस्ट मॅनेजमेंट आणि आयपंपनेट यांच्या सहाय्याने वांद्रे येथे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग आधारित माहिती व विश्लेषण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. माहितीच्या आधारे निर्णय घेण्यासाठी उपलब्ध तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व्हायला हवा तसेच मलनिस्सारण उदंचन केंद्रांचे कार्य अधिक अनुकूलित, कार्यक्षम आणि प्रभावी पद्धतीने चालविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करावा, अशा सूचना डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि तंत्रज्ञान भागीदारांना दिल्या. तसेच मलनिस्सारण व्यवस्था अधिक कार्यक्षम, विश्वासार्ह आणि तत्परतेने कार्यान्वित करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान, मशीन लर्निंग आणि पूर्वानुमानात्मक विश्लेषणाचा प्रभावी वापर करण्यासाठी पालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.