मुंबई

दूध भेसळीप्रकरणी सोनई डेअरीवर कारवाई

CD

दूध भेसळप्रकरणी सोनई डेअरीवर कारवाई
सहा दूध नमुन्यांमध्ये डिटर्जंट; १६,७३० लिटर दूध नष्ट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेत पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात कारवाई करण्यात आली आहे. यात प्रसिद्ध सोनई दूध डेअरीवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचा पुरवठा तसेच दूध संकलन व शीतकरण केंद्रांची तपासणी करण्यात आली.

मंचर परिसरातील मे. नवकार डिस्ट्रिब्युटर्स येथे ४ जुलै रोजी केलेल्या कारवाईत व्हे पावडर, व्हे पर्मट पावडर, डिटेर्जेन्ट, इमूल्सयफायर आदी पदार्थ आढळले. याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मे. आकाश डेअरी फार्म येथे घेण्यात आलेल्या सहा दूध नमुन्यांच्या तपासणीत सर्व नमुन्यांमध्ये डिटर्जंट आढळले. पूरक अहवालात अल्पहोक्स २०० इथओक्सयलेट अर्थात नॉन्यल्फेनॉल इथओक्सयलेट आढळल्याचे नमूद आहे. अथर्व मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट इंडस्ट्रीजच्या एका दूध नमुन्यातही डिटर्जंट आढळून तो मानवी सेवनास असुरक्षित ठरविण्यात आला. माळशिरस येथील महालक्ष्मी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स आणि डेलीविश अ‍ॅग्रो डेअरी प्रॉडक्ट प्रा. लि. येथे अनुक्रमे ७,६३४ आणि ९,०९६ लिटर दूध नष्ट करण्यात आले. दोन्ही प्रकरणांत एकूण १६,७३० लिटर दूध, किंमत ६.६९ लाख रुपये, नष्ट करण्यात आले. याप्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. मंचर प्रकरणात आतापर्यंत ३७ आरोपी निष्पन्न झाले असून २५ जणांना अटक करण्यात आली आहे. २६ अन्न आस्थापनांवर परवाना निलंबन अथवा व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दूध भेसळीतील पुरवठा साखळीचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyadhar Anaskar : आरबीआयच्या नव्या पतधोरणामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागण्याची शक्यता; समतोल राखण्याचे बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान

Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

Sakal Karandak Competition : पुणे विभागातून ‘लाजाळू’ अंतिम फेरीत; ‘ईमान’ला द्वितीय; ‘नातीगोती’ला तृतीय क्रमांक

Delhi Building Collapse: दिल्लीत भीषण दुर्घटना! चार मजल्यांची इमारत कोसळली, गरोदर मातेसह तिघांचा मृत्यू

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही कायम

SCROLL FOR NEXT