मुंबई

बेस्टच्या बससेवेला तंत्रज्ञानाची जोड

CD

बेस्टच्या बससेवेला तंत्रज्ञानाची जोड
अर्थसंकल्पात डिजिटल सुविधांना प्राधान्य; खर्चकपात, उत्पन्नवाढीचेही उद्दिष्ट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या बेस्ट उपक्रमाने प्रवाशांना अधिक दर्जेदार आणि आधुनिक सुविधा देण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला आहे. बससेवेची कार्यक्षमता वाढविण्यासोबतच प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी करण्यासाठी तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. बेस्टच्या नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.
बसचे रिअल टाइम लोकेशन, बस थांब्यावर पोहोचण्याची अचूक माहिती, डिजिटल माहिती फलक, ऑनलाइन तिकीट व्यवस्था आणि डिजिटल पेमेंट यांसारख्या सुविधा अधिक सक्षम करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रवाशांना बस कुठे आहे, ती थांब्यावर किती वेळात पोहोचणार आहे, तसेच मार्गावर वाहतूक कोंडी आहे का, याची माहिती मोबाईलवर मिळणे शक्य होणार आहे. परिणामी बसची प्रतीक्षा करण्याचा वेळ कमी होऊन प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करता येणार आहे.

इलेक्ट्रिक बससाठीही आधुनिक यंत्रणा
बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसची संख्या वाढत असताना चार्जिंग व्यवस्था, बॅटरीचे निरीक्षण, वाहनांची देखभाल आणि ऊर्जा व्यवस्थापनासाठी आधुनिक प्रणालींची आवश्यकता वाढणार आहे. त्यानुसार डिजिटल पद्धतीने वाहनांची तांत्रिक स्थिती, देखभाल आणि सुरक्षाव्यवस्थेवर लक्ष ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चालक-वाहकांच्या कामकाजाचे व्यवस्थापन आणि बसच्या फेऱ्यांचे नियोजनही तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न आहे.

तंत्रज्ञानातून खर्चकपातीचेही उद्दिष्ट
बेस्टसमोरील आर्थिक अडचणी आणि वाढती संचित तूट लक्षात घेता केवळ प्रवाशांना सुविधा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर न करता त्यातून खर्चकपात आणि उत्पन्नवाढ साधण्यावरही भर देणे आवश्यक आहे. इंधन आणि ऊर्जेची बचत, बसच्या फेऱ्यांचे अचूक नियोजन, वाहनांच्या देखभाल खर्चात बचत तसेच तिकीट महसूल वाढविण्यासाठी डिजिटल प्रणालींचा उपयोग करण्याचे उद्दिष्ट आहे.

बेस्टसमोर आर्थिक आव्हान
पारंपरिक बससेवेतून डिजिटल आणि स्मार्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे बेस्टला घेऊन जाण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे, मात्र आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी होणारा खर्च आणि त्यातून मिळणारा प्रत्यक्ष फायदा यांचा समतोल साधावा लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आधुनिक सुविधा देतानाच बेस्टचे आर्थिक पुनरुज्जीवन कितपत साध्य होते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirur News : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने आज शहर व परिसरातील कलाक्षेत्रावर शोककळा

नाना पाटेकर गेले, पण त्यांनी उभा केलेला ‘तो माणूस’ अजूनही जिवंत! राज ठाकरेंची भावूक पोस्ट

Latest Marathi News Live Update: अजिंठा- अंधारी धरणात पाटबंधारे विभागाची धडक कारवाई

Navratri 2026: ११ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरु; नऊ दिवसांच्या व्रतात काय करावे अन् काय टाळावे? जाणून घ्या नियम...

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT