‘मुंबई वन’ ॲपवर वर्षभरात
एक कोटी ३२ लाख तिकिटांची नोंदणी
- नऊ लाख १९ हजारांहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ‘मुंबई वन’ ॲपला वर्षभरात प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या ॲपच्या माध्यमातून एका वर्षात एक कोटी ३२ लाखांहून अधिक तिकिटे काढण्यात आली असून, नोंदणीकृत वापरकर्त्यांची संख्या नऊ लाख १९ हजारांवर पोहोचली आहे.
मेट्रो, उपनगरी रेल्वे, बेस्ट, नवी मुंबई महापालिका परिवहन सेवा (एनएमएमटी) यांसह ११ सार्वजनिक वाहतूक सेवा एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना वेगवेगळ्या ॲपचा वापर न करता प्रवासाचे नियोजन, तिकीट खरेदी आणि स्मार्ट कार्डचे व्यवस्थापन करता येते. ‘‘मुंबई वन ॲप हा आमच्या ‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेचा महत्त्वाचा भाग आहे. तिकिटांसाठी रांगेत उभे राहण्याची गरज दूर करून विविध वाहतूक सेवा एकाच ॲपवर उपलब्ध केल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचत असून, दैनंदिन प्रवास अधिक जलद, सोपा आणि सोयीस्कर होत आहे असे एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान आगामी काळात मेट्रोचे जाळे आणखी विस्तारले जाणार असल्याने विविध सार्वजनिक वाहतूक सेवांना जोडण्यासाठी ‘मुंबई वन’ ॲपची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.