मुंबई

समुद्रातील तरंगता कचरा हटवण्यासाठी मानवरहित विद्युत रोबोटिक

CD

समुद्रातील कचरा हटवण्यासाठी
रोबोटिक बोटींना पसंती
मुंबई, ता. ८ ः ससून डॉक आणि जमशेदजी बंदर परिसरातील समुद्रातील तरंगता कचरा यांत्रिक पद्धतीने हटविण्यासाठी आणखी दोन मानवरहित बोटींचा पुरवठा, संचालन आणि देखभाल करण्यास पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंजुरी दिली आहे. या तांत्रिक बोटी प्रदूषण रोखण्याबाबत समाधानकारक असून, पालिकेच्या पसंतीला उतरल्याचे प्रशासनाने सांगतले.
मुंबईतील प्रमुख बंदर परिसरातील प्लॅस्टिक आणि प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका आणि बंदर प्राधिकरणांकडून सुरू असलेल्या पर्यावरण स्वच्छता मोहिमेअंतर्गत या प्रकल्पासाठी पालिकेने ३.६४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. स्वयंचलित अथवा दूरस्थ पद्धतीने नियंत्रित करता येणाऱ्या विद्युत आणि सौरऊर्जेवर चालणाऱ्या बोटींच्या माध्यमातून समुद्रातील तरंगता कचरा हटविण्यात येणार आहे. गेल्या मे महिन्यात गेटवे ऑफ इंडिया आणि बधवार पार्क येथे दोन मानवरहित विद्युत बोटी तैनात केल्या होत्या. या उपक्रमाचे स्वागत करताना कुलाबा येथील भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी सांगितले की, या बोटींच्या माध्यमातून दररोज सुमारे ८० ते ९० किलो तरंगता कचरा गोळा केला जात आहे. पालिका प्रशासना या बोटींना मंजुरी दिली असून, त्याचा वापर अधिक प्रभावीपणे करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार

Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान - रामदास आठवले

Nana Patekar : अंत्यसंस्कारासाठी प्रशासनाची धावपळ; डोणजे येथील ‘नानावाडी’ फार्म हाऊस परिसरात अंत्यसंस्कार

Nana Patekar : नानाची वाडी झाली सुन्न! सिंहगडाच्या मातीत रमलेला, आणि येथेच विसावला; ग्रामस्थांची भावना

IndiGo Winter Schedule : प्रवाशांना मोठा झटका! बेळगाव-दिल्ली विमानसेवेला 'विंटर' ब्रेक; इंडिगो कंपनीकडून सेवांमध्ये बदल, आता आठवड्यातून तीनच उड्डाणे

SCROLL FOR NEXT