मुंबई

‘सकाळ करंडक’मध्ये ‘हर हर गंगे’ सर्वोत्कृष्ट

CD

‘सकाळ करंडक’मध्ये ‘हर हर गंगे’ सर्वोत्कृष्ट
मुंबई विभागीय अंतिम फेरीत तरुणाईचा जल्लोष
मुंबई, ता. ८ : ‘सकाळ करंडक’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या मुंबई विभागीय अंतिम फेरीत कीर्ती महाविद्यालयाच्या ‘हर हर गंगे’ एकांकिकेने विजेतेपद पटकावले. यासह या एकांकिकेची पुण्यात १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी निवड झाली आहे, तर दुसरा पुरस्कार डॉ. टी. के. टोपे रात्र महाविद्यालयाच्या ‘जिलेबी’ एकांकिकेला मिळाला.
माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात गुरुवारी (ता. ८) झालेल्या मुंबई विभागीय अंतिम फेरीत एकूण सात एकांकिका सादर करण्यात आल्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्या हस्ते पार पडले. या वेळी परीक्षक सुप्रिया विनोद, अभिजित झुंजारराव आणि ‘सकाळ करंडक’चे समन्वयक अंकित काणे उपस्थित होते. ‘यिन’चा १२वा वर्धापनदिन विशेषांक ‘युथ नेक्स्ट जेन’चे या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
--
स्पर्धेतील पारितोषिके
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : अभिषेक सकपाळ (जिलेबी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : मंथन सोलकर (माधव) जिलेबी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : मिताली जाधव (आई) मॅरेथॉन
सर्वोत्कृष्ट नेपथ्य : सार्थक ढोकळे (हर हर गंगे)
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : स्वानंदी पांचाळ (हर हर गंगे)
सर्वोत्कृष्ट संगीत : मिहान सुंभे (हर हर गंगे)
सर्वोत्कृष्ट लेखक : अजय पाटील (खोटं बोल नाऱ्या)
उत्तेजनार्थ अभिनय : श्रद्धा चव्हाण : आई/विमला (हर हर गंगे), यशराज गोळेचा : नवरा (शुभमंगल सावधान), अमित फुलावले : रिपोर्टर (शुभमंगल सावधान)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार

Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान - रामदास आठवले

Nana Patekar : अंत्यसंस्कारासाठी प्रशासनाची धावपळ; डोणजे येथील ‘नानावाडी’ फार्म हाऊस परिसरात अंत्यसंस्कार

Nana Patekar : नानाची वाडी झाली सुन्न! सिंहगडाच्या मातीत रमलेला, आणि येथेच विसावला; ग्रामस्थांची भावना

IndiGo Winter Schedule : प्रवाशांना मोठा झटका! बेळगाव-दिल्ली विमानसेवेला 'विंटर' ब्रेक; इंडिगो कंपनीकडून सेवांमध्ये बदल, आता आठवड्यातून तीनच उड्डाणे

SCROLL FOR NEXT