मुंबई

अन्ननलिकेत अडकलेले हाड दुर्बिणीद्वारे बाहेर

CD

मुंबई, ता. १२ : चिकन खाताना चुकून साडेतीन सेंटीमीटर लांबीचे टोकदार हाड गिळल्याने मिरा रोड येथील एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती धोक्यात आली. हे हाड अन्ननलिकेत अडकल्याने गंभीर गुंतागुंत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, वॉकहार्ट रुग्णालयातील डॉक्टरांनी दुर्बिणीद्वारे प्रक्रिया करून हाड बाहेर काढल्याने रुग्णाला मोठ्या शस्त्रक्रियेपासून वाचवण्यात यश आले.

मिरा रोड येथे राहणाऱ्या सुकुमार विश्वास (नाव बदलले आहे.) यांच्या घशात चिकन खाताना मोठे हाड अडकले. हे हाड अन्ननलिकेत अडकल्यामुळे आतील ऊतींना दुखापत होण्याचा धोका होता. हाड दीर्घकाळ अडकून राहिल्यास अन्ननलिकेला छिद्र पडणे, रक्तस्राव होणे तसेच गंभीर संसर्ग होण्यासारख्या गुंतागुंती उद्भवू शकल्या असत्या.

रुग्णाला मिरा रोड येथील वॉकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे कान-नाक-घसा, पचनसंस्था विकार आणि भूलतज्ज्ञांच्या पथकाने उपचारांची तयारी केली. त्यानंतर डोके व मान तसेच कवटीच्या तळाच्या शस्त्रक्रियेतील तज्ज्ञ डॉ. चंद्र वीर सिंह यांनी दुर्बिणीद्वारे प्रक्रिया करून अन्ननलिकेत अडकलेले हाड बाहेर काढले.

वेळीच उपचार महत्त्वाचे
चिकनचे हाड आकाराने लहान असले, तरी ते अन्ननलिकेत अडकल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते, असे डॉ. सिंह यांनी सांगितले. वेळेत निदान आणि उपचार केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते. हाड बाहेर काढल्यानंतर रुग्णाला वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. अन्ननलिकेला दुखापत झाल्याची लक्षणे आहेत का, याबाबतही तपासणी करण्यात आली.

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

IPL 2027 मध्ये रोहित शर्मा पुन्हा मुंबईचा कर्णधार? हार्दिक पंड्याचं काय होणार?

China Woman Story: एअर होस्टेसची नोकरी सोडली! आता खेकडे विकून 'ती' करते दिवसाला १४ लाखांची कमाई

BJP Victory: अमित शाह बोलले! राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, 2029च्या निवडणुकांमध्ये...

IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय; युवराज सिंगकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT