मुंबई

पश्चिम रेल्वेकडून अपघातग्रस्तांना १२९ कोटींची भरपाई

CD

पश्चिम रेल्वेकडून अपघातग्रस्तांना १२९ कोटींची भरपाई
तीन वर्षांत १,५५६ प्रकरणे; २०२४-२५ मध्ये सर्वाधिक भरपाईचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर झालेल्या विविध अपघातांतील मृतांच्या वारसांना आणि जखमी प्रवाशांना कोट्यवधी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. २०२३-२४ ते २०२५-२६ या तीन आर्थिक वर्षांत अपघातांच्या १,५५६ प्रकरणांमध्ये एकूण १२९ कोटी १४ लाख ८६ हजार रुपयांची भरपाई देण्यात आली. यामध्ये रेल्वेतून पडणे, रूळ ओलांडताना होणारे अपघात आणि इतर रेल्वे दुर्घटनांशी संबंधित प्रकरणांचा समावेश आहे.

२०२४-२५ मध्ये सर्वाधिक भरपाई
पश्चिम रेल्वेच्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात अपघातांची ५६६ प्रकरणे नोंदविण्यात आली. या प्रकरणांमध्ये ४८ कोटी ३४ लाख ९८ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. २०२३-२४ मध्ये ४९५ प्रकरणांत ४४ कोटी ४४ लाख ७७ हजार रुपये, तर २०२५-२६ मध्ये ४९५ प्रकरणांत ३६ कोटी ३५ लाख ११ हजार रुपयांची भरपाई देण्यात आली.

मृतांच्या वारसांना, जखमींनाही भरपाई
रेल्वे अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना, तर प्रवासी जखमी झाल्यास नियमानुसार पात्र प्रवाशाला नुकसानभरपाई दिली जाते. भरपाईची रक्कम अपघाताचे स्वरूप आणि लागू असलेल्या नियमांनुसार निश्चित केली जाते.

तिकीट हरवले तरी भरपाईचा हक्क
अपघाताच्या वेळी प्रवाशाचे तिकीट हरवले किंवा सापडले नाही, तरी केवळ या कारणावरून नुकसानभरपाई नाकारता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे अपघातग्रस्त प्रवाशांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळविण्याच्या प्रक्रियेत दिलासा मिळू शकतो. मुंबई उच्च न्यायालयानेही एका प्रकरणात रेल्वे दावा न्यायाधिकरणाचा आदेश रद्द करून मृत तरुणाच्या पालकांना आठ लाख १४ हजार ६४१ रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Delhi Police Detention Row : "या पोलिसांच्या बसेस आहेत की छळ छावण्या?"; आंदोलक नेहा बोराचा बसमधून व्हिडिओ शेअर करत थेट सवाल!

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Electric Shock: जमिनीपासून अवघ्या ४ फुटांवर वीजवाहिनी; विजेचा धक्का लागून दोन म्हशींचा मृत्यू; प्रसंगावधान राखल्याने तीन म्हशी वाचल्या

SCROLL FOR NEXT