टाटा पॉवरच्या ग्राहकांची डिजिटल पेमेंटला पसंती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबई शहर आणि उपनगरातील टाटा पॉवरच्या वीजग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी डिजिटल पर्यायाला मोठी पसंती दिली असून, जवळपास ९२ टक्के ग्राहक कॅशलेस बिल भरत आहेत. एकूण ग्राहकांपैकी जवळपास ६० टक्के ग्राहकांनी पेपरलेस बिलिंगचा स्वीकार केला आहे.
टाटा पॉवरने माय टाटा पॉवर ॲप, ग्राहक पोर्टल आणि व्हाट्स बुट यांसारख्या स्वयंसेवा सुविधांमुळे तसेच यूपीआय, नेट बँकिंग, कार्ड आणि ई-वॉलेट्ससारख्या विविध पेमेंट पर्यायांमुळे डिजिटल व्यवहारांना गती दिली जात आहे. या माध्यमांमुळे ग्राहकांना ग्राहक संबंध केंद्राला भेट न देता घरबसल्या बिल भरणे, डुप्लिकेट बिल डाऊनलोड करणे, वीज वापराचा मागोवा घेणे, तक्रार नोंदवणे आणि वीजजोडणी पुन्हा सुरू करण्याची विनंती करता येते. त्यामुळे रांगा आणि प्रतीक्षा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. पेपरलेस बिलिंगलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांना ई-मेल, एमएमएस आणि व्हाॅट्सॲपद्वारे बिले पाठवली जात असून, माय टाटा पॉवर ॲप किंवा पोर्टलवर ई-बिल सुविधेचा पर्याय उपलब्ध आहे. दरम्यान, प्रत्यक्ष सेवा माध्यमेही सुरूच राहणार असल्याचे टाटा पॉवरने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.