मुंबई

मुंबईसह कोकण किनारपट्टीला उष्णतेच्या लाटेचा इशारा

CD

मुंबईसह कोकण किनारपट्टीला उष्णतेच्या लाटेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ९ : मुंबई महानगर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर पुढील काही दिवस उकाडा आणि उष्णता प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. १२ ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तर उत्तर कोकणातील भागात तीव्र उकाडा आणि दमट हवामान राहील. येत्या ४८ तासांत महाराष्ट्रातील काही भागांत कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने टप्प्याटप्प्याने वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतरच्या दिवसांतही तापमानात एक ते तीन अंशांची वाढ नोंदवली जाऊ शकते. तसेच ९ आणि १० ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात कमाल तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांतील नऊ महापालिका क्षेत्रांचा समावेश असलेल्या संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात या उष्णतेचा आणि वाढत्या उकाड्याचा मोठा प्रभाव जाणवणार आहे. नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Raiway Tickets: GNWL, RLWL, PQWL, TQWL! रेल्वे तिकिटावर दिसणारे हे कोड असतात तरी काय? जाणून घ्या त्यांचा अर्थ

MPSC Student Agitation : परवानगी रद्द केल्यानंतरही आंदोलन; ‘एमपीएससी’ आंदोलक विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Maharashtra Live News : मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

गुलाबजामच्या पाकात उंदीर, भिवंडीतील मिठाईच्या दुकानात किळसवाणा प्रकार; Video Viral होताच एफडीएचा छापा

IND vs WI 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला आज तरी संधी मिळाली का? श्रेयस अय्यरने जाहीर केली Playing XI, विंडीजच्या संघात एक बदल

SCROLL FOR NEXT