मुंबई

दहा खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

CD

दहा खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित
नियमांच्या उल्लंघनामुळे एफडीएची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन न केल्याने मुंबईतील १० खाद्यपदार्थ विक्री आस्थापनांचे परवाने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) निलंबित केले.
हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, डेअरी आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांचा समावेश असलेल्या या कारवाईमुळे मुंबईतील खाद्य आस्थापनांच्या परवाना आणि स्वच्छतेच्या नियमांकडे लक्ष वेधले गेले आहे. अन्न व औषध प्रशासनाने ९ ऑक्टोबरला प्रसिद्ध केलेल्या पत्रकात याबाबत माहिती दिली आहे. अन्नसुरक्षा परवाना व नोंदणी, कामगारांची स्वच्छता, परिसराची स्वच्छता, कीटकनियंत्रण आणि अन्नपदार्थांची साठवणूक यांसारख्या बाबींच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली. तथापि, प्रत्येक आस्थापनात नेमकी कोणती त्रुटी आढळली, याचा स्वतंत्र तपशील प्रसिद्धिपत्रकात देण्यात आलेला नाही. भायखळा येथील जे. जे. रुग्णालय परिसरातील सेंट्रल कॅन्टीन, कांदिवली पूर्वेतील सिंह इस्टेट परिसरातील मिल्कौज डेअरी प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दुग्धजन्य पदार्थांशी संबंधित आस्थापना, सांताक्रूझ पश्चिमेतील लिंकिंग रोडवरील ला पिनोझ पिझ्झा आणि विलेपार्ले येथील डी. जे. संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग परिसरातील एफ३ कॉर्पोरेट हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस, ऑपेरा हाउसमधील पारस सेंटर येथील नारायण डोसा, गिरगावातील गोल्डन स्टार रेस्टॉरंट, चारकोपमधील पालीवाल डेअरी आणि मरीन लाइन्स परिसरातील नवाब ज्यूस सेंटर यांच्यावरही कारवाई झाली आहे. याशिवाय इस्लाम जिमखान्यातील हुमा केटरर आणि जे. जे. रुग्णालयाजवळील अब्रार किराणा स्टोअर यांचाही परवाने निलंबित केलेल्या आस्थापनांच्या यादीत समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd T20I: विंडीजची ढापाढापी.. संजू सॅमसनची 'विराट' विक्रमाशी बरोबरी, कोहलीने २०१९ मध्ये केलेला असा पराक्रम...

Gangapur News : लग्नानंतर काठी नवऱ्याला मारू नकोस, नाना पाटेकरांच्या त्या मिश्किल प्रतिक्रियेची साक्षी शिरसाटला आठवण

Maharashtra Live News : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे आंदोलन; १० खासदार राष्ट्रपतींच्या भेटीला

NCP Expulsion : बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत पुरुषोत्तम जगताप यांच्यासह बंडखोरांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी; विद्यमान अध्यक्षांवर तडकाफडकी कारवाई

Indian Raiway Tickets: GNWL, RLWL, PQWL, TQWL! रेल्वे तिकिटावर दिसणारे हे कोड असतात तरी काय? जाणून घ्या त्यांचा अर्थ

SCROLL FOR NEXT