मुंबई

मलजल बोगद्याचा ‘ब्रेक-थ्रू’ यशस्वी

CD

मलजल बोगद्याचा ‘ब्रेक-थ्रू’ यशस्वी
३१ जुलैला प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः समुद्र व नदीच्या पाण्यात सोडण्यात येणाऱ्या मलजलाची गुणवत्ता सुधारून जलप्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टीने पालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्राधान्य मलजल बोगदा टप्पा-१ प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा आज यशस्वीरीत्या पूर्ण झाला. बोरिवलीतील डॉन बॉस्को स्कूल जंक्शन ते नवीन मालाड उदंचन केंद्र यादरम्यान बांधण्यात येत असलेल्या ५.८ किलोमीटर लांबीच्या भूमिगत मलजल बोगद्याचे अंतिम ‘ब्रेक-थ्रू’ डॉन बॉस्को स्कूल जंक्शन येथे यशस्वीरीत्या पूर्ण झाले. या प्रकल्पाचे आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले असून, संपूर्ण प्रकल्प ३१ जुलै २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे प्रदूषण कमी होणार आहे.
पालिकेच्या मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागामार्फत मुंबई शहर व उपनगरांतील मलनिस्सारण यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण कामे हाती घेण्यात आली आहेत. मलजलावर योग्य प्रक्रिया करून त्याचा पर्यावरणपूरक पद्धतीने निचरा करणे, जलप्रदूषण कमी करणे आणि मुंबईकरांसाठी स्वच्छ व आरोग्यदायी पर्यावरण निर्माण करणे, हा या कामांचा प्रमुख उद्देश आहे. याच व्यापक उद्दिष्टाचा भाग म्हणून प्राधान्य मलजल बोगदा टप्पा-१ हा महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात येत आहे.
...
मलवाहिन्यांची क्षमता वाढणार
पश्चिम उपनगरातील दहिसर, बोरिवली, गोराई, चारकोप, मालाड व कांदिवली या परिसरातील सध्या अस्तित्वात असलेले मलजल वाहिन्यांचे जाळे हे सद्यःस्थितीतील मलजल वाहून नेण्यास सक्षम नाही. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मलवाहिन्यांची क्षमता वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Vote Theft : 'राष्ट्रपतींनी मतचोरीचे आरोप फेटाळले नाहीत, उलट मागितले पुरावे'; राहुल गांधींचा मोठा दावा, CEC ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचीही केली मागणी

MPSC Student Agitation : पेपरफुटीचे पुरावे दिल्यामुळेच विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे; आंदोलकांचा पोलिसांवर आरोप

Pune News : मानेखाली इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग ठेवून झोपला; आयटी अभियंता प्राणास मुकला, दोन दिवस फ्लॅटमध्ये पडून होता मृतदेह

Ganja Seized : उमरगा सीमेवर पोलीस अन् अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; ३.२४ कोटींचा ६४२ किलो गांजा जप्त

INDIA Bloc Vijay Chowk Protest: 'इंडिया' आघाडीचे नेते राष्ट्रपती भवनात; विजय चौकात खासदारांचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT