मुंबई

राडारोड्यावर पालिकेचा पहारा

CD

राडारोड्यावर पालिकेचा पहारा
आजपासून वाहनाला प्रतिदिन २५ हजारांचा दंड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : ​मुंबई शहरात बांधकाम आणि पाडापाडीतून निघणारा राडारोडा कुठेही फेकून पर्यावरणाची हानी करणाऱ्या विकसक, कंत्राटदार आणि वाहतूकदारांवर महापालिकेने आता कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. पालिकेच्या पोर्टलवर अधिकृत नोंदणी न करता आणि वाहनांवर ‘व्हिएकल ट्रॅकिंग सिस्टीम’ न बसवता मलब्याची वाहतूक केल्यास प्रतिवाहन दररोज २५ हजार रुपयांचा मोठा दंड आकारला जाणार आहे. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ही कारवाई सोमवारपासून (ता. १२) प्रत्यक्ष सुरू केली जाणार आहे.
​मुंबईत दररोज सुमारे आठ हजार मेट्रिक टन राडारोडा आणि मलबा तयार होतो. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची मूळ जबाबदारी संबंधित बिल्डर आणि कंत्राटदारांची असते, मात्र नियमांचे उल्लंघन करून हा मलबा नाले, खाडी परिसर, कांदळवने (मॅंग्रोव्हज), दलदलीचे भाग आणि जंगलांमध्ये बेकायदेशीरपणे फेकला जात असल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी मोकळ्या जमिनी हडपण्यासाठीही मलब्याचा वापर केला जातो. यामुळे पावसाळ्यात पुराचा धोका वाढण्यासोबतच हवेच्या गुणवत्तेवर आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत.
​हे बेकायदेशीर डम्पिंग रोखण्यासाठी महापालिकेने ‘मुंबई मलबा नियंत्रण व ट्रॅकिंग सिस्टीम’वर नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. मलबा निर्माण करणारे विकसक, कंत्राटदार, सरकारी संस्था आणि वाहतूकदारांना या प्रणालीवर नोंदणी करावी लागेल. मलबा वाहून नेणाऱ्या प्रत्येक वाहनावर पालिकेने मंजूर केलेली ट्रॅकिंग सिस्टीम लावणे अनिवार्य आहे.
मलब्याची विल्हेवाट फक्त महापालिकेने निश्चित केलेल्या अधिकृत जागीच करावी लागेल. तसेच वाहतुकीदरम्यान रस्त्यावर कचरा पडू नये, यासाठी वाहने पूर्णपणे झाकलेली असणे आवश्यक आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांसोबतच पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे. ​सोमवारपासून प्रत्यक्ष दंडात्मक कारवाई सुरू होणार असल्याने उर्वरित सर्व विकसक व वाहतूकदारांनी त्वरित नोंदणी करून वाहनांवर ट्रॅकिंग प्रणाली बसवून घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

आतापर्यंत १०९ विकसकांची नोंदणी
​महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आणखी १८ विकसकांनी या सिस्टीमवर नोंदणी केली असून, आतापर्यंत एकूण १०९ विकसकांनी नोंदणी पूर्ण केली आहे. याशिवाय महापालिका कंत्राटदार, सरकारी संस्था आणि ट्रान्सपोर्टर्स मिळून एकूण २२० घटकांनी नोंदणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT