सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरची आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : सायन रुग्णालयात एमएस (मास्टर ऑफ सर्जरी) प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या २६ वर्षीय निवासी डॉक्टरने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शिवचरण अप्पा पाटील असे या डाॅक्टराचे नाव आहे. शनिवारी (ता. १०) रात्री वसतिगृहात त्याने विषारी द्रव्याचे इंजेक्शन घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘शिवचरण याला अभ्यास आणि रुग्णालयातील कामाचा ताण हाताळण्यात अडचणी येत होत्या. त्याला काही वेळा घरीही पाठवण्यात आले होते तसेच त्याच्या वडिलांनाही परिस्थितीची माहिती देण्यात आली होती. दरम्यान, घटनेच्या दिवशी नेमके काय घडले, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शिवचरण हा मूळचा कर्नाटकातील होता. तो गुलबर्गा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एडीआर (अपघाती मृत्यू अहवाल) नोंदवण्याची प्रक्रिया झाली आहे. त्याचे सायन रुग्णालयातच शवविच्छेदन करण्यात आले असून, मृतदेह नातेवाइकांना सुपूर्द केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील निवासी डॉक्टरांवरील कामाचा आणि शैक्षणिक ताणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान, संबंधित डॉक्टरच्या मृत्यूचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.