मुंबई

‘एआय’च्या युगात मानवी मूल्यांचे शिक्षण गरजेचे!

CD

‘एआय’च्या युगात मानवी मूल्यांचे शिक्षण गरजेचे!
विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र विचारांना तंत्रज्ञानाची जोड द्या; शिक्षणतज्ज्ञांचे मत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे एआय शिक्षण आणि शिकण्याच्या पद्धती वेगाने बदलत असताना विद्यार्थ्यांमध्ये आत्मभान, भावनिक बुद्धिमत्ता, समीक्षात्मक विचार, करुणा आणि सहनशीलता यांसारखी मानवी मूल्ये विकसित करण्याची गरज आहे. तंत्रज्ञान विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र विचारांची जागा घेण्याऐवजी त्यांच्या शिकण्याला पूरक ठरले पाहिजे, असा सूर शिक्षण आणि मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.


जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ‘आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन’च्या चिल्ड्रन अँड टीन्स डेस्कतर्फे ‘एज्युकेटर्स एज : द ह्युमन एज इन द एज ऑफ एआय’ हा कार्यक्रम नुकताच पार पडला. यामध्ये शालेय प्रमुख, मानसशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि बालविकास तज्ज्ञ सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी एआयचा जबाबदारीने वापर करण्यासाठी शाळा आणि पालकांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचे डीन आणि सीईओ अभिमन्यू बासू यांनी सांगितले. एआय हे शिकण्याला मदत करणारे साधन असून, ते विद्यार्थ्यांच्या वतीने विचार करू शकत नाही याची जाणीव मुलांना करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कुटुंबातील अर्थपूर्ण संवाद कमी झाल्याने मुलांशी असलेल्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो, असे सिंघानिया ग्रुप ऑफ स्कूल्सच्या रेवती श्रीनिवासन यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या योग्य वापरासाठी मुलांमध्ये आत्मनियंत्रण आणि मूल्यांचा विकास महत्त्वाचा असल्याचे ‘दृष्टी’च्या संस्थापक डॉ. स्मिता देसाई यांनी नमूद केले.

भावनिक विकास महत्त्वाचा!
शिक्षकांचे मानसिक आरोग्यही विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे जयेश पंचाळ यांनी सांगितले. परीक्षा आणि गुणकेंद्री शिक्षणाऐवजी विद्यार्थ्यांची जिज्ञासा, स्वतंत्र विचार आणि शिकण्याची आवड वाढविण्यावर भर देण्याची गरज या वेळी व्यक्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT