मुंबई

हुकूमशाही सहन करणार नाही

CD

हुकूमशाही सहन करणार नाही

आदित्य ठाकरे : सरकार एवढे का घाबरतेय?

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : ‘विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यापासून का रोखले जात आहे? हे आंदोलन सरकारविरोधात नाही, तर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार आणि ‘मतचोरी’विरोधात आहे. मग भाजप हे आंदोलन स्वतःच्या विरोधात असल्यासारखे का घेत आहे,’ असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. ‘देशात अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. ही हुकूमशाही सहन केली जाणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला.

आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्याच्या कारवाईवर ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मतदानाचा अधिकार मागणाऱ्यांना ताब्यात घेतले जात असेल, तर सरकार एवढे का घाबरत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्ञानेशकुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनादरम्यान पोलिसांशी वाद झाल्याचा उल्लेख करताना ठाकरे म्हणाले, की आम्ही पोलिसांच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या घरांसाठीही लढतो. शुक्रवारी तुषार गांधी यांनाही सोडण्यात आले नाही. आंदोलनादरम्यान महिलांशी गैरवर्तन झाल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेक आंदोलकांना ताब्यात घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येत आहे.

‘मुंबईत नाकाबंदी सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर पोलिस रस्त्यावर तैनात आहेत. आपल्याच नागरिकांविरोधात युद्ध सुरू असल्यासारखी परिस्थिती आहे,’ असा आराेपही आदित्य ठाकरे यांनी केला. दरम्यान, पुढील आंदोलनाबाबत लवकरच माहिती दिली जाईल, असे ठाकरे यांनी या वेळी स्पष्ट केले.
===
अमित ठाकरेही मैदानात
मुंबईत सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यासाठी रविवारी अनेक जण शिवाजी पार्क येथे पोहोचले होते. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईच्या निषेधार्थ आम्ही येथे आलो आहोत, असे पोलिस ठाण्यात आलेले मनसे नेते अमित ठाकरे यांनी सांगितले.
==

==

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT