मुंबई

‘रेल्वे’मुळे काश्मिरी फळांना मुंबईची बाजारपेठ

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १२ : काश्मीरच्या सफरचंदांचा गोडवा आणि चेरीचा ताजेपणा आता मुंबईच्या बाजारपेठेत अधिक वेगाने पोहोचू लागला आहे. डोंगरदऱ्यांमधील अवघड रस्ते, वाहतूक कोंडी आणि खराब हवामानाच्या अडथळ्यांवर मात करत रेल्वेने काश्मीर आणि मुंबईदरम्यान व्यापाराची नवी वाट खुली केली आहे. चिनाब आणि अंजी पुलांमुळे काश्मीर खोऱ्याला देशाच्या रेल्वे जाळ्याशी जोडणाऱ्या मार्गाला बळ मिळाले असून, नाशवंत फळे अवघ्या ३० ते ३२ तासांत वांद्रे स्थानकात पोहोचत आहेत. वाहतुकीचा खर्च कमी होण्यासह फळांचे नुकसान घटत असल्याने काश्मीरमधील शेतकऱ्यांनाही दिलासा मिळत आहे.

काश्मीरमधून मुंबईपर्यंत फळे रस्त्याने आणण्यासाठी पूर्वी सुमारे ४३ ते ४५ तास लागत होते. डोंगराळ रस्ते, पावसामुळे होणारे अडथळे आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतुकीचा वेग मंदावत असे. प्रवासाला विलंब झाल्यास फळांचा दर्जा घसरून नुकसान होण्याची शक्यता वाढत होती. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतमालाला कमी भाव मिळण्याचे प्रकारही घडत होते. रेल्वेच्या माध्यमातून आता कमी वेळेत माल मुंबईत आणणे शक्य होत असल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळत आहे.

खर्चात ६० टक्क्यांपर्यंत बचत
चिनाब आणि अंजी पुलांमुळे शक्य झालेल्या रेल्वे संपर्काचा फायदा फळांच्या वाहतुकीत दिसू लागला आहे. रेल्वेमुळे वाहतूक खर्चात ५० ते ६० टक्क्यांपर्यंत बचत होत असून, फळे खराब होण्याचे प्रमाणही सुमारे ५० टक्क्यांनी घटल्याचा दावा काश्मीरमधील सफरचंद उत्पादक मोहम्मद अली शेख यांनी केला. माल वेळेत बाजारात पोहोचल्याने शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्याची शक्यता वाढली आहे.

महाराष्ट्राच्या बाजारपेठेशी नवे नाते
काश्मीरमधील सफरचंद, चेरी, अक्रोड, केशर, गालिचे आणि शाली यांना महाराष्ट्रात मोठी बाजारपेठ मिळवून देण्याची संधी या रेल्वे मार्गामुळे निर्माण झाली आहे. नियमित रेल्वे सेवा आणि पार्सल वाहतुकीची क्षमता वाढल्यास शेतमालाची जलद वाहतूक करणे अधिक सुलभ होऊ शकते. काश्मीर आणि महाराष्ट्रातील व्यापारी संबंध विस्तारण्यासाठी हा रेल्वे संपर्क महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी व्यक्त केला.

मुंबई : रेल्वेतून काश्मिरी फळे मुंबईच्या बाजारपेठेत आणली जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT