आंदोलकांसह नागरिकांनाही घेतले ताब्यात
पोलिसांच्या कारवाईवर स्थानिकांचा आक्षेप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : शिवाजी पार्क परिसरात रविवारी झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतला. आंदोलनाशी संबंध नसतानाही आणि कोणतेही कारण न सांगता आपल्याला ताब्यात घेण्यात आल्याचा दावा काही नागरिकांनी केला.
कोणतेही कारण न देता आम्हाला ताब्यात घेण्यात आले, ही हुकूमशाही आहे. आज आमच्यावर अशा प्रकारे कारवाई होत आहे, उद्या पोलिसांवरही अशी वेळ येऊ शकते. आम्ही या कारवाईचा निषेध करतो, असे स्थानिक अनुज मेहता यांनी सांगितले. हा एकप्रकारे अपहरणाचा प्रकार असल्याचे सांगत प्राची तळवलकर यांनीही कारवाईवर आक्षेप घेतला. दादरचे रहिवासी पंकज कामटे यांनी आंदोलनासाठी मुंबईच्या विविध भागांतून आलेल्या तरुणांना मदत करण्यासाठी आपण शिवाजी पार्क येथे आलो होतो; मात्र आपल्यावरही कारवाई झाल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे परिसरात एका कार्यक्रमात केटरिंगच्या कामासाठी आलो होतो. तसे सांगूनही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कामगार नितीन गुप्ता यांनी सांगितले.
----
४०० जणांवर कारवाई
शिवाजी पार्क येथे रविवारी पोलिसांनी अनेक आंदोलकांवर कारवाई केली. अनेकांना ताब्यात घेण्यात आले. सायंकाळपर्यंत जवळपास ४०० ते ५०० जणांवर कारवाई करण्यात आली.
---
पोलिसालाच उचलले!
एकीकडे शिवसेना भवनमध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसैनिकांना तसेच तरुण-तरुणींना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येत होते; मात्र त्या वेळी साध्या वेशात असलेल्या एका पोलिसालाच पोलिस उचलून गाडीत बसवत होते. त्याने वेळीच आपली ओळख सांगितल्यावर त्याची सुटका करण्यात आली.
---
कार्यकर्त्यांना घरातून अटक
शिवाजी पार्क येथे आंदोलनात होणारी गर्दी पाहता, पोलिसांनी शेकापच्या साम्या कोरडेसह मुंबईतील विविध कार्यकर्त्यांना घरी जाऊन अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.