मुंबई

गिरणी कामगारांच्या घरासाठी हेदुटणेची साडेचार हेक्टर जागा मिळणार

CD

गिरणी कामगारांच्या घरासाठी हेदुटणेची साडेचार हेक्टर जागा मिळणार
जिल्हाधिकाऱ्यांकडून लवकरच जागेबाबत पत्र मिळणार; ४,५०० घरे उभारता येणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : गिरणी कामगारांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य म्हाडाच्या माध्यमातून मुंबईसह एमएमआर क्षेत्रात जागांचा शोध घेत आहे. त्यानुसार वांगणी, शेलूबरोबरच आता कल्याणनजीक असलेल्या हेदुटणे येथील तब्बल ४.७ हेक्टर शासकीय जमीन म्हाडाला मिळणार आहे. त्याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडून लवकरच म्हाडाला सुपूर्द केले जाणार आहे. या जागेवर सुमारे ४,५०० घरे गिरणी कामगारांकरिता उभारणे शक्य होणार आहे.
मुंबईतील एक लाखाहून अधिक गिरणी कामगार घरासाठी पात्र झाले असून, आतापर्यंत सुमारे १७-१८ हजार कामगारांना घरे मिळाली आहेत, तर उर्वरित कामगारांना घरे देण्यासाठी सरकार खासगी विकसकांच्या माध्यमातून शेलू आणि वांगणी येथे घरे उभारत आहे, मात्र वांगणीची घरे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने अडगळीत असल्याने त्याला कामगारांकडून नापसंती दर्शवली जात आहे, तर शेलूला घरे घेण्यास अनेक कामगार तयार आहेत. त्यानंतर आता राज्य सरकारची हेदुटणे येथे असलेली जवळपास साडेआकरा एकर जमीन म्हाडाला मिळणार आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तयारी दर्शवली असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ही जमीन ताब्यात आल्यानंतर प्रकल्प अहवाल तयार करून सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

उत्तर शीवचा नाद सोडणार
शिळफाटा नजीक उत्तर शीव येथे ७.५ हेक्टर सरकारी जमीन असून, त्यावर ७,५०० घरे होऊ शकणार आहेत, मात्र त्या ठिकाणी स्थानिकांचा विरोध असून, त्यांनी म्हाडाला सदर जमिनीची मोजणी करू दिलेली नाही. त्यामुळे सदरची जमीन गिरणी कामगारांच्या घरासाठी घेण्याबाबत तूर्तास म्हाडाने नाद सोडला असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT