मुंबई

‘आय लव्ह यू’ ते ‘मुंबई पोलिस हाय हाय’

CD

‘आय लव्ह यू’ ते ‘मुंबई पोलिस हाय हाय’
दोन दिवसांच्या आंदोलनात पोलिसांवर जेन-झी संतप्त
नितीन जगताप : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : एरवी मुंबई पोलिसांसाठी ‘आय लव्ह यू’चे नारे देणाऱ्या जेन-झीने या वेळी मुंबई पोलिसांच्या सौजन्यावर दिल्ली पोलिसांची काळी छाया पडल्याची खंत व्यक्त केली. ‘जब जब सरकार डरती है, पोलिस को आगे करती है!’ अशी घोषणा देत शिवाजी पार्क येथील मूक मोर्चादरम्यान आंदोलकांनी ही खदखद बोलून दाखवली.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान आणि आंदोलनापूर्वी पोलिसांनी अनेक तरुणांना ताब्यात घेतले. अगदी लहान बाळ असलेल्या आदोलकांनाही सोडले नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. काहींना फरपटत नेले, असा आरोप तरुणाईचा आहे.

जोगेश्वरीला राहणाऱ्या पूर्वा पी. के. नावाच्या तरुणीने ‘सकाळ’ला सांगितले, की रविवारी सकाळी ११ वाजता सहा पोलिस माझ्या घरात आले. मोर्चाला परवानगी नाही म्हणून तुला तिकडे जाऊ देणार नाही, असे सांगून सकाळी ११ ते संध्याकाळी ७ पर्यंत ते माझ्या घरासमोर ठाण मांडून बसले. त्यामुळे माझ्या घरच्यांना आणि शेजाऱ्यांना मानसिक त्रास झाला. हा माझ्या मूलभूत अधिकारावर घातलेला घाला आहे, अशा शब्दांत तिने संताप व्यक्त केला.
आतापर्यंत माझ्या मनात मुंबई पोलिसांची प्रतिमा चांगली होती; मात्र दोन दिवसांच्या आंदोलनात पोलिसांची वर्तणूक बघता ती प्रतिमा डळमळीत झाली आहे, असे तन्वी राव या तरुणीने सांगितले. शांततेत आंदोलन सुरू असताना तरुणांवर गुन्हे दाखल केले, हे चुकीचे आहे. ७० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक जयश्री परब यांनी ठाकरेंच्या आदेशामुळेच आज शिवसैनिकांनी भाजपला मतदान केले आहे, हे भाजपने विसरू नये, असे सांगितले.
...
नाराजी मान्य
आंदोलकांना हाताळताना आतापर्यंत पोलिसांनी संयम दाखवला. त्यांच्याकडून आम्हाला प्रशंसा मिळाली; मात्र रविवारच्या आंदोलनात आम्हाला कठोर कारवाई करावी लागली. त्यामुळे स्वाभाविक जेन-झी आमच्यावर नाराज आहे. आतापर्यंतचे आमचे सर्व प्रयत्न शून्यावर आले आहेत, असे एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर मान्य केले. सोमवारी पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही, हेदेखील आवर्जून सांगितले.
==
छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आयकॉन आहेत. निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू आहे; मात्र पोलिसांनी आमच्यावर दडपशाही केली.
- यश कांबळे, आंदोलक
==
लोकशाही देशात जनतेचा आवाज दडपला जात नाही; मात्र हे सरकार तरुणांना हाउस अरेस्ट करीत आहे. आम्ही दहशतवादी नाही, तर देशाचे भविष्य आहोत!
- उत्सव सिंग, आंदोलक
==
पोलिसी कारवाई केवळ एका व्यक्तीला वाचवण्यासाठी होत असून, मुंबई पोलिस आता दिल्ली पोलिसांप्रमाणे अमानुष वागले.
- शहानवाज आलम
==
==

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT