आवाज कुणाचा... ठाकरेंचा!
शिवाजी पार्क पुन्हा दणाणले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांना जेन-झीच्या आंदोलनात जाण्यापासून रोखणे मुंबई पोलिसांना चांगलेच महागात पडले. आज आदित्य ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जेन-झी, डाव्या संघटना आणि शिवसैनिकांनी शिवाजी पार्कवर जोरदार गर्दी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार आणि भाजप सरकारच्या विरोधात झालेल्या या आंदोलनामुळे दादरचे छत्रपती शिवाजी महाराज मैदान पुन्हा सरकारविरोधी घोषणांनी दणाणून सोडले. या वेळी अनेक आंदाेलकांनी काळे कपडे परिधान करून निषेध केला.
आमदार आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, महेश सावंत, अनिल परब, खासदार अनिल देसाई, तेजस ठाकरे यांच्यासह महापालिकेतील अनेक नगरसेवक उपस्थित होते. ‘देशद्रोही, गद्दार ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात आमचा लढा सुरू असून, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही,’ अशी आक्रमक भूमिका आदित्य ठाकरे यांनी या वेळी मांडली. ‘हे सरकार मतचोरी आणि निवडणूक चोरीने बनले आहे,’ अशी टीका त्यांनी केली.
दुसरीकडे, लोकशाही वाचवा हा नारा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (मनसे) आज सायंकाळी शिवाजी पार्कवर स्वाक्षरी मोहीम राबवली. या वेळी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, उर्वशी ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे उपस्थित होते. ‘पोलिस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी लोकांच्या मनातील राग या स्वाक्षरी मोहिमेतून स्पष्ट दिसत आहे,’ असे मनसेच्या नेत्यांनी सांगितले. युवा वर्ग, महाविकास आघाडीचे नेते आणि मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे आजचा दिवस मुंबईच्या राजकारणात चांगलाच गाजला.
...........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.