मुंबई

आश्रय योजनेचा खर्च १५० कोटींवर

CD

आश्रय योजनेचा खर्च १५० कोटींवर
तीन सफाई कामगार वसाहतींच्या पुनर्विकासासाठी ५२ टक्के वाढ; कंत्राटदाराला दरवाढीचा लाभ
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १३ : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांसाठी असलेल्या महत्त्वाकांक्षी ‘आश्रय योजने’चा खर्च दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर फुगत चालल्याचे समोर आले आहे. पश्चिम उपनगरांतील तीन प्रमुख सफाई कामगार वसाहतींच्या पुनर्विकासाच्या कंत्राट रकमेत दुसऱ्यांदा मोठी वाढ करण्यात आली असून, मूळ ९७ कोटी रुपयांचे हे काम आता थेट १५० कोटी ४२ लाख रुपयांवर पोहोचले आहे. प्रशासनाने आराखड्यात आणि बांधकाम क्षेत्रफळात वारंवार केलेल्या बदलांमुळे मूळ खर्चात तब्बल ५२.४० टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, या कामाला १० महिन्यांची मुदतवाढ देण्यासह कंत्राटदाराला वाढीव दरवाढीचा भरभक्कम लाभ देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायीबसमितीसमोर सादर करण्यात आला आहे.
​पालिकेच्या पी/दक्षिण विभागातील जे. पी. नगर, आर/दक्षिण विभागातील आकुर्ली रोड आणि आर/मध्य विभागातील बाभई नाका येथील सफाई कामगारांच्या जुन्या चाळी व इमारतींचा पुनर्विकास करून बहुमजली इमारती उभारण्यासाठी ‘डिझाइन आणि बिल्ट टर्नकी गट-८’ अंतर्गत हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये स्थायी समितीने २१,६७६.१३ चौरस मीटर बांधकामासाठी ‘मेसर्स देव इंजिनिअर्स’ या कंत्राटदाराला ९७ कोटी ८१ लाख रुपयांच्या कामाला मंजुरी दिली होती, मात्र इमारत प्रस्ताव विभागाकडून आराखडे मंजूर होत असताना क्षेत्रफळ वाढल्याने जुलै २०२४ मध्ये पहिल्या फेरफाराद्वारे ही रक्कम १३१ कोटी १७ लाख रुपयांवर नेण्यात आली.
​आता पुन्हा एकदा अग्निशमन दलाच्या अटी-शर्ती, अधिक चांगले व्हेंटिलेशन, रुंद पॅसेज आणि कम्युनिटी स्पेस या कारणास्तव पालिकेच्या वास्तुशास्त्रज्ञांनी आराखड्यात नव्याने बदल केले आहेत. यामुळे बांधकाम क्षेत्रफळात ३,९६७.२४ चौरस मीटरची वाढ होऊन ते ३३,०३५.३७ चौरस मीटरवर पोहोचले आहे. परिणामी, कंत्राटदाराच्या रकमेत आणखी १९ कोटी २५ लाखांची भर पडली असून, सुधारित कंत्राट रक्कम आता १५० कोटी ४२ लाख रुपयांवर गेली आहे. पाणीपट्टी, मलनिःसारण आकार आणि १० टक्के पालिका पर्यवेक्षण शुल्कासह या प्रकल्पाचा एकूण सुधारित प्रशासकीय खर्च तब्बल १८० कोटी ६१ लाख रुपयांवर पोहोचणार आहे.

सहा मजली इमारती
​या प्रकल्पामध्ये जे. पी. नगर येथे स्टिल्ट अधिक २३ मजली, आकुर्ली रोड येथे स्टिल्ट अधिक १८ मजली आणि बाभई नाका येथे तळमजला अधिक सहा मजली इमारती उभारण्यात येणार असून, याद्वारे सफाई कामगारांसाठी एकूण ४८१ सदनिका उपलब्ध होणार आहेत, मात्र कंत्राटदाराला २४ महिन्यांच्या मूळ मुदतीऐवजी १० महिने वाढवून ३४ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच, कामाचा कालावधी वाढल्याचा हवाला देत किमतीतील फरकाचे अधिदान पाच टक्क्यांवरून थेट १० टक्के करण्यात आल्यामुळे कंत्राटदाराला कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Rally: शेअर बाजारात तुफान तेजी! गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स १,१०९ अंकांनी वधारला

Pregnant journalist allegation: गर्भवती महिला पत्रकाराला राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप; 'एक्स-रे'वरून काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न

Latest Marathi News Live Update: गोडाऊनसमोर लावलेली दुचाकी चोरीला

जैन आहे 'सनई चौघडे' मधील अभिनेत्री; घरी नवरात्री कशी साजरी होते हे सांगताना म्हणाली- आम्ही नऊ दिवस...

WTC Points Table: ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताच्या WTC Final खेळण्याच्या स्वप्नाचा चुराडा? जाणून घ्या समीकरण

SCROLL FOR NEXT