सेस इमारतीमधील भाडेकरूंच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी एजन्सी मिळेना
म्हाडा पुन्हा निविदा काढणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : दक्षिण मुंबईतील जुन्या आणि धोकादायक सेस इमारतींमधील भाडेकरू आणि रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यासाठी म्हाडाला एजन्सी मिळत नसल्याचे समोर आले आहे.
येथील रहिवाशांचे सर्वेक्षण करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार चार एजन्सी पुढे आल्या होत्या, मात्र त्यापैकी एकही एजन्सी पात्र ठरली नसल्याने म्हाडा आता अटी-शर्ती शिथिल करून नव्याने टेंडर काढणार आहे.
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत सुमारे साडेबारा हजारहून अधिक सेस इमारती आहेत. या इमारतींमधील मूळ भाडेकरू कोण, प्रत्यक्ष वास्तव्य कोणाचे, पोटभाडेकरू, अनधिकृत ताबा याबाबत अनेकदा वाद निर्माण होतात. पुनर्विकासावेळी पात्रता निश्चित करण्यासाठी बायोमेट्रिक सर्व्हेक्षण अत्यंत आवश्यक मानले जाते. यासाठी म्हाडाने एजन्सी नेमण्यासाठी निविदा काढली होती. एजन्सीचा वार्षिक टर्नओव्हर किती असावा, या क्षेत्रातील अनुभव किती वर्षांचा असावा, एका वर्षात किती इमारतींचे ऑडिट करण्याची क्षमता असावी, याबाबतच्या अटींमुळे निविदा भरलेल्या चारही एजन्सी अपात्र ठरल्या असल्याची माहिती मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
म्हाडाने काढलेल्या निविदेनुसार चार एजन्सी प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या, परंतु तांत्रिक छाननीत त्या क्वालिफाय होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करावी लागली. आता म्हाडाने अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. टर्नओव्हरची मर्यादा कमी करणे, अनुभवाच्या अटीत सूट देणे आणि एका वर्षात करावयाच्या सर्वेक्षण संख्येचे लक्ष्य वास्तववादी ठेवण्याबाबत विचार सुरू आहे. सुधारित अटींसह लवकरच नव्याने निविदा काढण्यात येणार असून, यामुळे अधिक एजन्सी सहभागी होतील आणि सेस इमारतींच्या सर्वेक्षणाला गती मिळेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.