मुंबई

कुपोषणाविरोधात ‘मिशन एक हजार दिवस’

CD

कुपोषणाविरोधात ‘मिशन एक हजार दिवस’
मुंबई महापालिकेची मोहीम; गर्भवती महिला, बालकांच्या पोषणावर विशेष लक्ष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि माता-बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘मिशन एक हजार दिवस’ ही विशेष मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या मोहिमेअंतर्गत गर्भधारणेपासून बालक दोन वर्षांचे होईपर्यंतच्या कालावधीत माता आणि बालकांच्या आरोग्याची, पोषणाची तसेच सर्वांगीण विकासाची विशेष काळजी घेतली जाणार आहे.
बालकाच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक आणि मानसिक विकासासाठी आयुष्यातील पहिले एक हजार दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. हे लक्षात घेऊन महापालिकेकडून गर्भवती महिला, नवजात बालके आणि दोन वर्षांपर्यंतच्या बालकांना आरोग्य, पोषण आणि देखभालीसंदर्भातील विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ‘मिशन एक हजार दिवस’च्या माध्यमातून गर्भवती महिला आणि दोन वर्षांपर्यंतच्या बालकांना आवश्यक आरोग्यसेवा एकत्रितपणे उपलब्ध करून देत कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचा आणि बालकांचा निरोगी विकास सुनिश्चित करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे.

गर्भवती महिलांची नियमित तपासणी
या मोहिमेत गर्भवती महिलांची नोंदणी, नियमित आरोग्य तपासणी, पोषणविषयक मार्गदर्शन आणि सुरक्षित प्रसूतीवर भर दिला जाणार आहे. गर्भवती महिलांमधील उच्च जोखमीच्या गर्भधारणेची विशेष निगराणी करून आवश्यकतेनुसार उपचार केले जातील. तसेच महिलांना संतुलित आहार, विश्रांती आणि स्तनपानाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

बालकांच्या आहार, विकासावर लक्ष
बालकाच्या जन्मानंतर सुरुवातीच्या सहा महिन्यांत आईचे दूध लवकर सुरू करणे आणि केवळ स्तनपानावर भर देणे, याबाबत जनजागृती केली जाणार आहे. सहा महिन्यांनंतर बालकाला पूरक आहार देण्यास प्रोत्साहन दिले जाईल. यासोबतच बालकांचे नियमित लसीकरण, वजन आणि उंचीची तपासणी तसेच वयानुसार होणाऱ्या शारीरिक विकासाचे मूल्यमापन केले जाणार आहे. बालकांमध्ये कुपोषणाची लक्षणे आढळल्यास त्यांची वेळेत ओळख करून आवश्यक उपचार आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे.

विविध आरोग्यसेवांचा एकत्रित आढावा
महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत उपलब्ध असलेल्या माता-बाल आरोग्य नोंदी, आरोग्य व्यवस्थापनाशी संबंधित नोंदी आणि एकात्मिक बालविकास सेवा यांच्या आधारे या मोहिमेचे नियोजन केले जाणार आहे. गर्भधारणेतील नोंदणीपासून प्रसूती, लसीकरण, पोषण, बालकांच्या विकासाची तपासणी आणि दोन वर्षांपर्यंतच्या आरोग्यसेवांचा आढावा घेतला जाईल.
आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन कुटुंबांशी संपर्क साधतील. आवश्यक आरोग्यसेवा पूर्ण झाल्या आहेत की नाही, कोणत्या सेवा प्रलंबित आहेत आणि कोणत्या सेवा अद्याप मिळालेल्या नाहीत, याची माहिती संकलित केली जाणार आहे. गरजेनुसार संबंधित कुटुंबांना पुढील उपचार आणि सेवांसाठी मार्गदर्शन केले जाईल.

झोपडपट्टी भागांतील माता-बाल आरोग्याला प्राधान्य
मुंबईतील झोपडपट्टी भागांमध्ये माता आणि बालकांच्या आरोग्याशी संबंधित समस्या अधिक प्रमाणात आढळत असल्याने या भागांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. गर्भवती महिलांना वेळेवर आरोग्यसेवा मिळणे, बालकांचे योग्य पोषण होणे आणि कुपोषणाची सुरुवातीलाच ओळख पटणे, हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात महत्त्वाची बैठक

Sugarcane Rate Agitation : ऊसदराच्या आंदोलनामुळे कोगनोळी टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

'या गोजिरवाण्या घरात' मधली दीक्षा आठवते? सध्या काय करते? सांगितलं छोट्या पडद्यावर न दिसण्याचं कारण

SCROLL FOR NEXT