मुंबई

कोस्टल रोडच्या कामासाठी गोरेगावातील स्लिप रोड महिनाभर बंद

CD

गोरेगावातील स्लिप रोड महिनाभर बंद
कोस्टल रोड अंतर्गत उड्डाणपुलाच्या पिलर्सच्या उभारणीचे काम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : कोस्टल रोड प्रकल्पाच्या ‘नॉर्थ पॅकेज बी’ अंतर्गत उड्डाणपुलाच्या पिलर्सच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी गोरेगावमधील वासरी हिल जंक्शनकडून एमटीएनएल जंक्शन आणि स्वामी विवेकानंद रोडच्या दिशेने जाणाऱ्या वीर सावरकर उड्डाणपुलाच्या स्लिप रोडवर खोदकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे हा स्लिप रोड सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ९ नोव्हेंबरपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
गोरेगाव वाहतूक विभागाने या पार्श्वभूमीवर परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत. ही व्यवस्था ९ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली असून, ९ नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार आहे. इनॉर्बिट मॉल जंक्शनकडून वासरी हिल रोडमार्गे गोरेगाव पूर्वेकडे जाणाऱ्या वाहनांच्या मार्गात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही वाहतूक वीर सावरकर उड्डाणपुलावरून पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे, मात्र इनॉर्बिट मॉल जंक्शनकडून एमटीएनएल जंक्शन आणि स्वामी विवेकानंद रोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. या वाहनांनी वासरी हिल जंक्शन येथे ईझ झोन मॉलजवळ डावीकडे वळून डी. जी. खेतान इंटरनॅशनल स्कूलमार्गे सुंदर नगर रोडने पुढे जावे, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कामाच्या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच वाहतूक चिन्हे आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन गोरेगाव वाहतूक विभागाने केले आहे.

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

IPL 2027 मध्ये रोहित शर्मा पुन्हा मुंबईचा कर्णधार? हार्दिक पंड्याचं काय होणार?

China Woman Story: एअर होस्टेसची नोकरी सोडली! आता खेकडे विकून 'ती' करते दिवसाला १४ लाखांची कमाई

BJP Victory: अमित शाह बोलले! राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, 2029च्या निवडणुकांमध्ये...

IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय; युवराज सिंगकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT