मुंबई

नाना पाटेकर, मधु कांबीकर यांना पालिकेकडून भावपूर्ण श्रद्धांजली :

CD

नाना पाटेकर, मधू कांबीकर यांना श्रद्धांजली
​बहुरंगी व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक बांधिलकीचा महासभेत गौरव
​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : आपल्या जिवंत आणि प्रभावी अभिनयाने रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेला विशेष प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री व नृत्यांगना मधू कांबीकर यांना मंगळवारी महापालिकेच्या महासभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कलेप्रती असलेली असीम निष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम असलेल्या या दोन्ही महान कलावंतांचे कार्य कायम स्मरणात राहील, अशा भावना या वेळी व्यक्त करण्यात आल्या.

​महासभेत सभागृह नेते गणेश खणकर यांनी नाना पाटेकर आणि मधू कांबीकर यांच्या निधनाबद्दलचा शोक प्रस्ताव मांडला. महापौरांनी आणि विविध पक्षांच्या गटनेत्यांनी या दोन्ही कलाकारांच्या योगदानाचा आदरपूर्वक गौरव केला. ‘‘नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीसह मराठी रंगभूमी आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. या प्रतिभावंत कलाकारांच्या जाण्याने सांस्कृतिक विश्वातील एका महत्त्वपूर्ण पर्वाचा अंत झाला आहे,’’ अशा शब्दांत महापौर रितू तावडे यांनी शोक व्यक्त केला.
शोक प्रस्तावाला अनुमोदन देताना पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी नाना पाटेकर यांच्या प्रदीर्घ कलाप्रवासाचा आणि सामाजिक कार्याचा गौरव केला, तर शिवसेना नगरसेवक यशोधर फणसे यांनी ‘‘नानांच्या जाण्याने एक चांगला मित्र व मार्गदर्शक गमावला’’ अशी भावना व्यक्त केली.
​
‘‘नाना तत्त्वाने जगणारे, पडद्यावर आणि प्रत्यक्ष आयुष्यातही भूमिका प्रामाणिकपणे निभावणारे माणूस होते,’’ असे भाजप नगरसेवक नवनाथ बन व नगरसेविका श्रद्धा जाधव म्हणाल्या. तर ‘‘तापट स्वभावाचे नाना ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी किती मायाळू होते, हे सर्वांनी पाहिले,’’ अशी आठवण यामिनी जाधव यांनी सांगितली.

​मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्काराची मागणी
​मनसे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी मागणी केली की, ‘‘नाना पाटेकर यांचा रंगभूमीपासून चित्रपटांपर्यंतचा प्रवास अभूतपूर्व होता. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, मात्र प्रतिष्ठेचा ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार’ मिळाला नाही. त्यांना मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात यावा, हीच चाहत्यांची खरी भावना आहे.’’
​काँग्रेस गटनेते अशरफ आझमी यांनी आठवण सांगताना सांगितले की, ‘‘नाना महान कलाकार आणि तितकेच मोठे माणूस होते. स्वतःसाठी दीड कोटींची आलिशान कार खरेदी करायची असताना, शेतकऱ्यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच त्यांनी ते पैसे एक हजार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना देऊन मदत केली होती.’’
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; हल्लेखोर महिला दारुच्या नशेत, शिव्याही दिल्या

Pune Crime : गणेशोत्सवात दागिने चोरणारी हरियाणाची टोळी गजाआड; साडेचार हजार किलोमीटर पाठलाग करून कारवाई

Mohol News : आठव्या दिवशीही जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचे उपोषण सुरूच; प्रकृती खालावली, दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

Saudi Attack: 'हल्ल्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नका!'... सौदीतील भारतीयांना कोणी दिला इशारा?

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT