मुंबई

मुंबईतील डॉमिनोजसह तीन हॉटेलचे परवाने निलंबित; राज्यभर एफडीएची धडक कारवाई

CD

मुंबईत डॉमिनोजसह तीन हॉटेलचे परवाने निलंबित
राज्यभर एफडीएची धडक कारवाई; बीडमध्ये १० लाखांचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभरात धडक कारवाई केली आहे. मुंबईतील डॉमिनोज पिझ्झासह तीन हॉटेल व खाद्य व्यवसायांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आणि वाहनासह १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये संशयित अपमिश्रित व चुकीचे ब्रँडिंग केलेले १२ हजार ३८२ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे.
मुंबईतील परळ येथील डॉमिनोज पिझ्झा, भांडुप पश्चिम येथील माझ फूड पार्सल अँड केटरिंग आणि कुर्ला पश्चिम येथील मुघल ढाबा यांच्यावर कारवाई करण्यात आली. डॉमिनोज पिझ्झाच्या तपासणीत शाकाहारी व मांसाहारी पदार्थ एकाच डीप फ्रिजमध्ये ठेवणे, चिकन व पनीर एकाच ओव्हन किंवा ग्रिलवर तयार करणे, तसेच पॅकेजिंग साहित्याची आवश्यक कागदपत्रे आणि वितरण वाहनांच्या नोंदी नसल्याचे आढळले. सुधारणा नोटीस देऊनही त्रुटी कायम असल्याने १२ ऑक्टोबरला परवाना निलंबित करण्यात आला.

भांडुपमधील माझ फूड पार्सल अँड केटरिंगच्या स्वयंपाकघरात झुरळांचा प्रादुर्भाव, अस्वच्छ गटारे, तयार अन्नपदार्थांवर लेबल नसणे आणि कृत्रिम खाद्यरंग आढळले. मेनूमध्ये बटर नमूद असताना फॅट स्प्रेडचा वापर करणे आणि कर्मचाऱ्यांकडे आवश्यक संरक्षक साहित्य नसणे, अशा त्रुटींमुळे १३ ऑक्टोबरला परवाना निलंबित करण्यात आला. मुघल ढाब्यात ऑनलाइन मागविलेल्या शिळ्या अन्नाची तक्रार आल्यानंतर तपासणी करण्यात आली. त्यात अस्वच्छ परिसर, साचलेले घाण पाणी, गंजलेली उपकरणे आणि शाकाहारी-मांसाहारी पदार्थांचे योग्य विलगीकरण नसल्याचे आढळल्याने नोंदणी निलंबित करण्यात आली.

़़़़़़़़़़़़़

बीड जिल्ह्यातील लिंबागणेश येथे १२ ऑक्टोबरच्या कारवाईत चार लाख ६० हजार ५६ रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आणि पाच लाख ४० हजार रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले. याप्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

़़़़़़़़़़
छत्रपती संभाजीनगर येथील बजरंग ट्रेडिंग कंपनीच्या खाद्यतेल पुनर्पॅकिंग केंद्रात सोयाबीन तेल आणि पामोलीन तेलाचा १२ हजार ३८२ किलो साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत २३ लाख ३५ हजार ६५४ रुपये आहे. तपासणीत स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळल्याने खाद्यतेल केंद्राचा परवानाही निलंबित करण्यात आला आहे.

अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा गैरप्रकारांबाबत तक्रार करण्यासाठी नागरिकांनी एफडीएच्या १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा ‘अधिकृत तक्रार पोर्टलवर’ (https://complaints.mahafda.in) संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

IPL 2027 मध्ये रोहित शर्मा पुन्हा मुंबईचा कर्णधार? हार्दिक पंड्याचं काय होणार?

China Woman Story: एअर होस्टेसची नोकरी सोडली! आता खेकडे विकून 'ती' करते दिवसाला १४ लाखांची कमाई

BJP Victory: अमित शाह बोलले! राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, 2029च्या निवडणुकांमध्ये...

IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय; युवराज सिंगकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT