मुंबई

पद्मसिंह पाटलांच्या सुटकेला आव्हान

CD

पद्मसिंह पाटलांच्या सुटकेला आव्हान
पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी सीबीआयचे अपील
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि चालकाच्या २० वर्षांपूर्वीच्या हत्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने मुख्य आरोपी आणि माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह अन्य आरोपींची निर्दोष सुटका केली होती. त्यांच्या सुटकेला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
सीबीआयने पाटील आणि अन्य आरोपींविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी आवश्यक व सबळ पुरावेच सादर केले नाहीत. हा खटला मुख्यत्त्वे माफीचा साक्षीदार झालेल्या आरोपीच्या कबुलीजबाबावर आधारित होता; परंतु त्याचे कबुलीजबाब दबावाखाली घेतल्याचे आणि तो सतत बदल्याने त्यात विसंगती आढळल्याचे निरीक्षण विशेष न्यायालयाने नोंदवले. सर्व आरोपींना संशयाचा फायदा देऊन न्या. सत्यनारायण नावंदर यांनी आरोपींची निर्दोष सुटका केली होती. या निकालाविरोधात अखेर सीबीआयने उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. हा निकाल कायद्याच्या चौकटीत चुकीचा असून, तो रद्द करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर न्या. सारंग कोतवाल आणि न्या. रणजितसिंह भोंसले यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी (ता.१५) सुनावणी होण्याची शक्यता आहे. सीबीआयच्या आधी निंबाळकर कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन विशेष न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Victory: अमित शाह बोलले! राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, 2029च्या निवडणुकांमध्ये...

IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय; युवराज सिंगकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

यवतमाळमध्ये एसटी बस अन् दुचाकीचा भीषण अपघात, दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

Water Supply : टंचाईग्रस्त गावांत पाण्याची गुणवत्ता तपासणार; १८ हजार ६५० नागरिकांना पिण्यासाठी टँकरद्वारे पाणी

Aadhaar Server Down : आधार सर्व्हर ठप्प, नवीन परिपत्रकाचा पेच; दुय्यम निबंधक कार्यालयांत दस्त नोंदणीचा खोळंबा!

SCROLL FOR NEXT