प्रारूप मतदार यादीवर दावे,
हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
निवडणूक आयोगाचा निर्णय; अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबवण्यात येत असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर-२०२६) अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यासाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र नागरिक आणि नवमतदारांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले आहे.
मुंबई शहर आणि उपनगर क्षेत्रात ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार, नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नोंदींमध्ये दुरुस्ती करणे, नाव वगळणे किंवा अन्य हरकती नोंदवण्यासाठी आता २६ ऑक्टोबरपर्यंत मुदत मिळणार आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार नोटीस टप्पा आणि प्राप्त झालेले दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे, तर पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाईल.
.....
‘‘मुंबईतील सर्व पात्र नागरिकांनी आणि विशेषतः नवमतदारांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन विहित मुदतीत आपले आवश्यक अर्ज आणि दावे निवडणूक शाखेकडे सादर करावेत, जेणेकरून अंतिम मतदार यादीत एकाही पात्र मतदाराचे नाव सुटणार नाही.’’
- अश्विनी भिडे (जिल्हा निवडणूक अधिकारी तथा पालिका आयुक्त)
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.