मुंबई

झाडांची काळजी घ्या, दुर्घटना टाळा

CD

झाडांची काळजी घ्या, दुर्घटना टाळा
नियमित पाहणीसह पाण्याचा नियोजनबद्ध वापर करण्याचे पालिकेचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबई शहर व उपनगरांमध्ये झाडे तसेच त्यांच्या मोठ्या फांद्या कोसळून होणारे अपघात रोखण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. हवामानातील बदल, वाढते तापमान आणि पाण्याची टंचाई यांमुळे वृक्षांवर ताण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या परिसरातील झाडांची योग्य निगा राखण्याचे आणि आवश्यक काळजी घेण्याचे जाहीर आवाहन महापालिकेने नागरिक व गृहनिर्माण संस्थांना केले आहे.
​​झाडांना पाणी देताना शक्यतो पिण्याच्या पाण्याचा वापर टाळावा, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्याऐवजी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमधून प्रक्रिया केलेले, सुरक्षित आणि पुनर्वापरयोग्य पाणी वापरण्यास प्राधान्य द्यावे. गृहनिर्माण संस्थांनी आपल्या आवारातील झाडांची संख्या, त्यांची स्थिती आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन पाण्याचा नियोजनबद्ध वापर करावा, ज्यामुळे जलसंधारणासोबतच वृक्षांचे आरोग्यही जपले जाईल.
​​झाडे किंवा फांद्या पडण्याच्या दुर्घटना टाळण्यासाठी केवळ पाणी देणे पुरेसे नसून नियमित पाहणी करणे आवश्यक आहे. नागरिकांनी आणि सोसायटी व्यवस्थापनाने महत्त्वाच्या घटकांवर विशेष लक्ष ठेवावे. ​झाडाच्या बुंध्याला भेगा पडणे किंवा झाड एका बाजूला झुकणे,​मोठ्या फांद्या सुकणे किंवा तुटण्याच्या स्थितीत असणे, ​झाडाची मुळे जमिनीवर उघडी पडणे अथवा कमकुवत होणे याकडे लक्ष देण्याचे सांगण्यात आले आहे.
​
उद्यान विभागाला माहिती द्यावी!
आपल्या परिसरात किंवा सोसायटीच्या आवारात धोकादायक झाडे अथवा कमकुवत फांद्या आढळल्यास नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष न करता, याबाबतची माहिती तातडीने महापालिकेच्या संबंधित विभागीय कार्यालयाला अथवा उद्यान विभागाला द्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात महत्त्वाची बैठक

Sugarcane Rate Agitation : ऊसदराच्या आंदोलनामुळे कोगनोळी टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

'या गोजिरवाण्या घरात' मधली दीक्षा आठवते? सध्या काय करते? सांगितलं छोट्या पडद्यावर न दिसण्याचं कारण

SCROLL FOR NEXT