मुंबई

अंजी पुलावर श्रद्धेचा अनोखा संगम

CD

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा

अंजी, ता. १५ : खोल दरी, सभोवताली उंच डोंगर आणि प्रचंड वेगाने वाहणारे वारे.. अशा प्रतिकूल परिस्थितीत जम्मू-काश्मीरमधील अंजी खड्ड रेल्वे पुलाची उभारणी करण्यात आली. या पुलाच्या बांधकामादरम्यान कामगारांनी बांधकामाच्या ठिकाणी उभारलेल्या कालीमातेच्या मंदिरात आजही भारतीय सैनिकांकडून नियमित पूजाअर्चा केली जाते.

जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात अंजी नदीच्या खोल दरीवर हा पूल उभारण्यात आला आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्गावरील कटरा-बनिहाल विभागाचा हा महत्त्वाचा भाग आहे. हा पूल देशातील पहिला केबल-आधारित रेल्वे पूल आहे. नदीच्या पात्रापासून सुमारे ३३१ मीटर उंचीवर असलेल्या या पुलाला ९६ केबलचा आधार देण्यात आला आहे. दुर्गम भौगोलिक परिस्थिती, खोल दरी आणि जोरदार वारे यांचा विचार करून पुलाची रचना करण्यात आली. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अभियंते आणि कामगारांनी मोठे परिश्रम घेतले.

संघर्षात मंदिराची उभारणी
पुलाचे बांधकाम सुरू असताना परिसरात प्रचंड वेगाने वारे वाहत होते. दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे कामात अनेक अडचणी येत होत्या. या काळात कंत्राटदार आणि कामगारांनी एकत्र येऊन कालीमातेचे मंदिर उभारले. मंदिराच्या प्रवेशद्वारावर १७ मार्च २००८ ही तारीख नमूद आहे. मंदिर उभारल्यानंतर पुलाच्या कामाला गती मिळाल्याची भावना कामगारांच्या आहे.

मंदिराची जबाबदारी भारतीय सैनिकांकडे
पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असले, तरी मंदिरातील पूजाअर्चेची परंपरा आजही सुरू आहे. मंदिरात कालीमातेची मूर्ती आणि शिवशंकराची पिंड असून, भारतीय सैनिकांकडून दररोज पूजा केली जाते.

अंजी : खड्ड रेल्वे पुलाच्या बांधकामादरम्यान कामगारांनी कालीमातेचे मंदिर उभारले आहे.

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

Latest Marathi News Update: कॅफेबाहेर खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला अटक

Hingoli District Earthquake : हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर २.९ तीव्रतेची नोंद

IND vs WI : अर्शदीप सिंग पाचव्या T20I मधून बाहेर गेला, तर त्याची जागा कोण घेणार; ३६ वर्षीय गोलंदाजाच्या कमबॅकची तुफान चर्चा

SCROLL FOR NEXT