मुंबई

मुंबई-बंगळूर प्रवास सहा तासांनी होणार कमी

CD

मुंबई-बंगळूर प्रवास सहा तासांनी होणार कमी
शयनयान वंदे भारत धावण्यासाठी सज्ज

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबई ते बंगळूर या लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासासाठी लागणारा वेळ कमी करण्याच्या दृष्टीने शयनयान वंदे भारत एक्स्प्रेस महत्त्वाची ठरणार आहे. राज्यातील पहिली शयनयान वंदे भारत या मार्गावर सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, ही गाडी सुमारे एक हजार किलोमीटरचे अंतर १६ तासांत पार करणार आहे. सध्या या प्रवासासाठी २२ तास लागत असल्याने नव्या गाडीमुळे प्रवाशांच्या प्रवासात सुमारे सहा तासांची बचत होण्याची अपेक्षा आहे.
मुंबई आणि बंगळूर ही दोन्ही शहरे उद्योग, माहिती तंत्रज्ञान, व्यापार आणि रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाची केंद्रे आहेत. या शहरांदरम्यान दररोज मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. त्यांचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई ते बंगळूर यादरम्यान उद्यान एक्स्प्रेस धावते. या प्रवासासाठी सुमारे २२ तास लागतात. शयनयान वंदे भारतमध्ये प्रवाशांना प्रवासादरम्यान दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी खाद्यपदार्थांच्या व्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे. दसऱ्यानंतर ही गाडी प्रवासी सेवेत दाखल करण्याचे नियोजन असल्याची माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
...
लांब पल्ल्याच्या प्रवासाला नवा पर्याय
देशातील पहिली शयनयान वंदे भारत एक्स्प्रेस हावडा ते कामाख्या या मार्गावर सुरू करण्यात आली आहे. या गाडीमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वंदे भारतच्या शयनयान सेवेचा पर्याय उपलब्ध झाला. आता मुंबई-बंगळूर मार्गावरही अशी सेवा सुरू झाल्यास महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांदरम्यानच्या रेल्वे संपर्काला चालना मिळू शकते. विशेषतः नोकरी, व्यवसाय आणि पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्यांना कमी वेळेत इच्छित स्थळी पोहोचण्याचा पर्याय मिळण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IDBI Bank Privatisation : आयडीबीआय बँक झाली पूर्णपणे खाजगी! ५२,८७८ कोटी रुपयांना ६०% हिस्सा कॅनेडियन कंपनीला विकण्यास मंजुरी

Pune News : पुणे जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या आठवरून दहा; जुन्नर, आंबेगावचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश

Maharashtra Live News : दुष्काळ आणि नापिकीच्या विवंचनेतून चंद्रपुरात ३५ वर्षीय शेतकऱ्याने संपवले जीवन

Sugarcane Rate Agitation : ऊस दराचा भडका! ३१ तासांनंतर महामार्गावरील चक्काजाम मागे; केंद्रीय मंत्र्यांच्या घराकडे 'शेतकरी पदयात्रा' सुरू, साताऱ्यात 'काटा बंद'चा इशारा!

Sinhgad Fraud News : शंभर कोटींच्या बिनव्याजी कर्जाचे आमिष; जाधवर संस्थेची ८७.६१ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार; नऱ्हे पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT