मुंबई

मुंबईत डॉमिनोजच्या ३ शाखांसह १७ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबितझुरळे, उंदरांचा उपद्रव आणि अस्वच्छता आढळली; चार आस्थापनांना १ लाख ३० हजार रुपयांचा दंड

CD

डॉमिनोजच्या तीन शाखांसह १७ खाद्य
आस्थापनांचे परवाने निलंबित
उंदरांचा उपद्रव; चार आस्थापनांना एक लाख ३० हजारांचा दंड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) डॉमिनोज पिझ्झाच्या तीन शाखांसह मुंबईतील १७ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. तपासणीदरम्यान अनेक खाद्य आस्थापनांमध्ये झुरळे आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव, उंदरांनी कुरतडलेली अन्नपदार्थांची पाकिटे, खराब अन्नसामग्री तसेच वापरलेले आणि जळालेले तेल अशा गंभीर त्रुटी आढळल्या.
काही आस्थापनांमध्ये कच्चे आणि शिजवलेले अन्नपदार्थ तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकाच ठिकाणी ठेवण्यात आले होते. कर्मचाऱ्यांकडे अन्न हाताळताना आवश्यक असलेली सुरक्षा साधनेही नव्हती. एफडीएच्या माहितीनुसार, गोवंडी येथील एमीना हॉटेल, कांदिवलीतील आशीर्वाद सुपर स्टोअर, शिवडीतील थँक्सगिव्हिंग पॅटिसरी, सांताक्रूझमधील कार्निव्हल बाय ट्रेसिंड, खार येथील हंडो पिझ्झा आणि अंधेरीतील दार्जिलिंग लेपचा मोमोज यांच्यासह अन्य आस्थापनांवरही कारवाई करण्यात आली आहे. लोअर परळ येथील इन्स्टाकार्ट सर्व्हिसेसचाही कारवाई झालेल्या आस्थापनांच्या यादीत समावेश आहे. सणासुदीच्या काळात करण्यात आलेल्या तपासणीच्या आधारे चार आस्थापनांना एकूण एक लाख ३० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

राज्यभरात कारवाई
एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात निकृष्ट दर्जाचे, असुरक्षित आणि चुकीची माहिती असलेले, लेबल लावलेले एकूण २४ हजार ४०६ किलो अन्नपदार्थांवर कारवाई करण्यात आली. या मालाची किंमत ५० लाख १९ हजार रुपये आहे. यामध्ये खाद्यतेल, मिठाई, भगर, साबुदाणा, सुपारी, वेफर्स आणि कुट्टूचे पीठ यांचा समावेश आहे.

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
इतर जिल्ह्यांतही कारवाई
- छत्रपती संभाजीनगर : तेल पॅकिंग करणाऱ्या दोन आस्थापनांतून १७ हजार ७८४ किलो तेल जप्त करण्यात आले. या तेलाची किंमत ३९ लाख १५ हजार रुपये असून, दोन्ही आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.

- पुणे आणि सांगली : मिठाई, वेफर्स, चकली, भगर आणि साबुदाणा यांसह चार लाख ४६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

- नाशिक आणि अहिल्यानगर : हलवा आणि भगरचा ९४० किलो साठा जप्त करण्यात आला. या मालाची किंमत दोन लाख ६४ हजार रुपये आहे.

- नागपूर : ९७८ किलो सुपारीच्या साठ्यावर कारवाई करण्यात आली. या साठ्याची किंमत तीन लाख ९१ हजार रुपये आहे.

- कांदिवली : उपवासासाठी वापरल्या जाणाऱ्या कुट्टूच्या पिठाचा १७.५ किलो साठा जप्त करण्यात आला.

कोकण : प्रतिबंधित अन्नपदार्थांचा एक लाख सात हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IDBI Bank Privatisation : आयडीबीआय बँक झाली पूर्णपणे खाजगी! ५२,८७८ कोटी रुपयांना ६०% हिस्सा कॅनेडियन कंपनीला विकण्यास मंजुरी

Pune News : पुणे जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या आठवरून दहा; जुन्नर, आंबेगावचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश

Maharashtra Live News : दुष्काळ आणि नापिकीच्या विवंचनेतून चंद्रपुरात ३५ वर्षीय शेतकऱ्याने संपवले जीवन

Sugarcane Rate Agitation : ऊस दराचा भडका! ३१ तासांनंतर महामार्गावरील चक्काजाम मागे; केंद्रीय मंत्र्यांच्या घराकडे 'शेतकरी पदयात्रा' सुरू, साताऱ्यात 'काटा बंद'चा इशारा!

Sinhgad Fraud News : शंभर कोटींच्या बिनव्याजी कर्जाचे आमिष; जाधवर संस्थेची ८७.६१ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार; नऱ्हे पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT