मुंबई

ऑक्टोबरच्या उकाड्याचा वन्यजीवांना फटका

CD

ऑक्टोबरच्या उकाड्याचा वन्यजीवांना फटका
मुंबई महानगर क्षेत्रात ७५ हून अधिक प्राणी व पक्ष्यांचे यशस्वी रेस्क्यू
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १५ : मुंबईसह लगतच्या महानगर क्षेत्रात ऑक्टोबर महिन्यातील वाढत्या उकाड्याचा आणि कडक उन्हाचा वन्यजीव व पक्ष्यांना मोठा फटका बसला आहे. या वाढत्या उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या व जखमी झालेल्या ७५ हून अधिक वन्यप्राणी आणि पक्ष्यांना महाराष्ट्र राज्य वन विभाग व एका स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरीत्या वाचवण्यात (रेस्क्यू) आले आहे.
​रेस्क्युंक्स असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आणि मुंबईचे मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर हीटमुळे बाधित झालेल्या प्राण्यांना वैद्यकीय मदत देऊन त्यांचा जीव वाचवण्यासाठी वन विभाग व रेस्क्यू टीम अहोरात्र कार्यरत आहे.
​​उकाड्याने हैराण झालेल्या व मदतीची गरज असलेल्या विविध प्रजातींच्या प्राण्यांचा बचाव करण्यात आला आहे. १२ हून अधिक प्रजातींचे साप, घोरपड आणि फ्लॅपशेल कासव, तर सस्तन प्राण्यांमध्ये बोनेट व रेसस प्रजातीची माकडे, हनुमान लंगूर, खार, मुंगूस आणि वटवाघळे यांना रेस्क्यू करण्यात आले आहे. तर पक्षांमध्ये घार, घुबड, पोपट, कोकिळा, बगळा व ढोक यांना जीवदान देण्यात आले आहे.
​ ​पवन शर्मा यांनी सांगितले की, मुंबई महानगर क्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये आमची पथके आणि दोन्ही वन्यजीव रुग्णवाहिका २४ तास सलग कार्यरत आहेत. ऑक्टोबरच्या उन्हामुळे डिहायड्रेशन, उष्माघात आणि थकवा आलेल्या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी प्रशिक्षित बचाव पथक, पशुवैद्यकीय डॉक्टर आणि पुनर्वसनतज्ज्ञ अहोरात्र मेहनत घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

Latest Marathi News Update: कॅफेबाहेर खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला अटक

Hingoli District Earthquake : हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर २.९ तीव्रतेची नोंद

IND vs WI : अर्शदीप सिंग पाचव्या T20I मधून बाहेर गेला, तर त्याची जागा कोण घेणार; ३६ वर्षीय गोलंदाजाच्या कमबॅकची तुफान चर्चा

SCROLL FOR NEXT