मुंबई

महापालिकेला आता विहिरींची आठवण

CD

महापालिकेला आता विहिरींची आठवण
पुनरुज्जीवनासाठी विभागवार निधीची तरतूद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा, पावसाचे बदलते प्रमाण आणि भविष्यातील संभाव्य एल निनोचा प्रभाव यामुळे महापालिकेला आता शहरातील विहिरींची आठवण झाली आहे. पालिकेने विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याची योजना आखली आहे.
अनेक ठिकाणी विहिरींची देखभाल न झाल्याने, गाळ साचल्याने किंवा पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाल्याने त्यांचा नियमित वापर होत नाही. अशा विहिरींची स्थिती तपासून आवश्यक दुरुस्ती, स्वच्छता आणि पुनरुज्जीवनाची कामे हाती घ्यावीत, असे आवाहन स्थायी समिती अध्यक्ष शिंदे यांनी केले आहे. विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी विभागवार निधीची तरतूद करण्यात आली असून या कामाला वेग द्या, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले आहेत. मुंबईतील वाढती पाण्याची गरज आणि भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने विहिरींच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू केली आहे. पुनरुज्जीवनाच्या कामाला वेग देण्यासाठी विभागवार निधी देण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला स्थायी समितीचे अध्यक्ष शिंदे यांनी दिले आहेत.
...
मुलुंडमध्ये प्रयोग
मुलुंडच्या नवघर या विभागात गेल्या अनेक वर्षांपासून वापरात नसलेली विहीर पुनरुज्जीवित करण्यात आली असून, त्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. हा प्रयोग मुंबईभर राबविण्याचा त्यांचा निर्धार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

CBI Raid : पुण्यात सीबीआयचे छापे! ‘म्युनिशन्स इंडिया’च्या कार्यकारी संचालकासह तिघांना अटक; सव्वादोन कोटींची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT