मुंबई

महापालिकेचा ‘सुजाण नागरिक-सक्षम भारत’ उपक्रम; आज मुख्यमंत्री व निवृत्त सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत सोहळा

CD

महापालिकेचा ‘सुजाण नागरिक-सक्षम भारत’ उपक्रम
मुख्यमंत्री व निवृत्त सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत आज सोहळा
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १५ : महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्ये, मूलभूत कर्तव्ये, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांची जाणीव रुजविण्यासाठी ‘सुजाण नागरिक-सक्षम भारत’ या अभिनव शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्‍घाटन तसेच ‘स्मार्ट नागरिक आणि विद्यार्थी प्रेरणा’ या पुस्तिकेचे प्रकाशन शुक्रवारी (ता. १६) दुपारी ३ वाजता होणार आहे.
​दादर (पश्चिम) येथील भवानी शंकर मार्ग स्थित मुंबई पब्लिक स्कूलमध्ये हा सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शुभ हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ होईल. ​याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
​तसेच खासदार अनिल देसाई, स्थानिक लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर, पालिका गटनेते, विविध समित्यांचे अध्यक्ष आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ​विद्यार्थ्यांना सुजाण, कर्तव्यदक्ष आणि जबाबदार नागरिक बनवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT